पथनाट्याद्वारे “७३ वा संविधान दिवस व २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली”

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.27नोव्हेंबर):- विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेण्ट बडनेरा- अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक तर्फे महाविद्यालयात “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता “७३व्या संविधान दिवस निमत्त्य सामूहिक प्रस्तावना वाचन” व “२६/११ च्या भ्याड हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली” देत रासेयो स्वयंसेवकांद्वारे महाविद्यालय परिसर आणि साईनगर चौक येथे पथनाट्याद्वारे संविधान दिवस बाबत जनजागृती केली.

देशामध्ये २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाची अमल बजावणी करण्यात आली होती म्हणून मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या आदेशानुसार २०१५ पासून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रस्तावित कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उपप्राचार्य प्रा. पि व्ही खांडवे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन केले. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्यातील शहिदांना मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर रासेयो स्वयंसेवकांद्वारे महाविद्यालय परिसर आणि बडनेरा जुनी वस्ती येथे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रस्तावना वाचन रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. गायत्री बहिरे, रासेयोचे सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम कदम, प्रा. अनुराधा इंगोले, प्रा अतुल डहाने, प्रा अपर्णा खैरकर, प्रा आशुतोष उगवेकर, श्री. निशांत केने व रासेयो स्वयंसेवक यांच्या सहभागातून केले. पथनाट्याचे आयोजन आणि सादरीकरण रासेयो स्वयंसेवक सुरज मुंदे, प्राप्ती उगले, जानव्ही ठाकरे, सार्थक चितोडे, कारमेश पुंड, वृषाली देशमूख, मिताली पकडे, प्रतीक चौधरी, हर्ष माकोडे, पूजा सोनोने, आकांक्षा तायडे, वेदांत वंदिले, सुरज शर्मा यांच्या सहभाग आणि परिश्रमातून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उपप्राचार्य प्रा. पि व्ही खांडवे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, सचिव श्री. युवराजसिंगजी चौधरी, सन्माननिय सदस्य श्री. शंकरराव काळे, श्री. नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED