जवाहर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

32

✒️अहमदनगर प्रतिनिधी(रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.27नोव्हेंबर):- जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता.नेवासा, जि. अहमदनगर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी, प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर लेखन स्पर्धा यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक श्रीकांत कातोरे, प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा रावसाहेब राशिनकर, उच्च माध्यमिक विद्यालय समन्वयक प्रा भाऊसाहेब तांबे, ज्येष्ठ शिक्षक,प्रा. भगवान भाबड,प्रा. संदीप बुचकुल,संजय ढेरे,राजेश शेंडगे,प्रविण कार्ले,वसतिगृह अधीक्षक फलके सर, व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी श्रीमती रुख्मिणी सोनवणे,अश्विनी दहातोंडे, प्रिया लहारे,भावना कांबळे, श्रीमती नेहुलकर,फरिदा पठाण,श्रीमती गायकवाड यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रघुनाथ भोजने होते.

कार्यक्रम प्रसंगी ,प्रा. भगवान भाबड व प्रा. संदीप बुचकुल यांनी मनोगत व्यक्त करताना संविधान दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. भाऊसाहेब तांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संविधानाचे वाचन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती स्वाती दळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .प्रा. रावसाहेब राशिनकर यांनी आभार प्रदर्शन करताना संविधान दिन ही स्वलिखीत काव्य रचना सादर करून उपस्थितांचे आभार मानले.२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली.