राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27नोव्हेंबर):-स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे समान संधी केंद्रांतर्गत सामाजिक न्याय विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रासेयो कार्यकमाधिकारी प्रा.डॉ. कत्रोजवार, म्हणाले की संविधान जगण्याचा मार्ग आहे ,समाजात समता, व बंधुत्व रुजविण्यासाठी नवयुवकानी पुढाकार घेतला पाहिजे. अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य लेप्ट डॉ प्रफुल्ल बनसोड होते. ते आपल्या भाषणात म्हणाले राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक लोकशाही लोकापर्यत पोहचली पाहीजे.

आज आपण उजळ माथ्याने वावरत आहेत हे संविधानातील अभिव्यक्ती व विचारस्वातंत्र्या मुळेच पण स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नाही. हे सुद्धा युवकानी लक्षात घेतले पाहिजे. प्रास्ताविकेत आशूतोष पोपटे म्हणाले की , सर्व जातीला एकत्र आणण्याचे कार्य संविधानाने केले आहे.प्रमुख पाहुणे प्रा कार्तिक पाटील डॉ.हरेश गाजभिये रासेयो विभागीय समन्वयक प्रा.पिसे रासेयो कार्यकम अधिकारी प्रा राजुरवाडे आदिची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यकमाचे सूत्रसंचालन कु जयश्री शिवरकर आभार साक्षिता नन्नावरे, गितगायन ऐश्वर्या सूर्यवंशी, उरकुडे यांनी केले. कार्यकम यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्रा डॉ. राहांगडाले, प्रा. डॉ. कामडी प्रा.डॉ मेंदूलकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले.*

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED