बाबासाहेबांच्या संविधानामुळे सावित्रीबाई च्या लेकींची गगनभरारी – शुभम मंडपे यांचे प्रतिपादन

84

🔹काळसर येथे रमाबाई व यशोधरा महिला मंडळ च्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.27नोव्हेंबर):- संविधान दिन संपूर्ण देशामध्ये व जगामध्ये साजरा होत आहे संविधान दिनाच्या निमित्ताने मौजा काळसर येथे रमाई महिला मंडळ व यशोधरा महिला मंडळ च्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला , महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे या देशातील बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित भारतीय संविधानामुळे या देशातील महिलांना समतेचे व बंधुतेच सन्मानाच जगन मिळाल आहे 

आज भारतीय संविधानामुळे महिलांना देशाच पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार,खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सरपंच व प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याधिकारि, तहसीलदार अशा अनेक प्रशासकीय नोकरीत संधी मिळत आहे त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सावित्रीबाई फुले यांच्या लेकिंचि गगन भरारी होत आहे अशे प्रतिपादन फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आंबोली ग्राम पंचायत सदस्य व वंचित बहुजन युवा आघाडी चे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष शुभम मंडपे यांनि केले

रमाई महिला मंडळ व यशोधरा महिला मंडळ च्या वतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व महिला मंडळीना बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाचे वाटप करण्यात आले व संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष खोब्रागडे सर, प्रमुख मार्गदर्शक मनुन डॉ बाळासाहेब बनसोड, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चिमुर राज्यउपाध्यक्ष कास्टराइब शिक्षक संघटना, आंबोली ग्राम पंचायत सदस्य व युवाआघाडी जिल्हाउपाध्यक्ष शुभम मंडपे, लालाजि मेश्राम तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी चिमुर व मिलिंद पाटिल व आदी उपस्थित होते