जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंपळे बु।। येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!..

31

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.29नोव्हेंबर):- जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंपळे बु।। ता.धरणगाव येथे दिनांक 28/11/2022 सोमवार रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

सदर कार्यक्रम प्रसंगी क्रांतीसूर्य ज्योतीराव फूले यांच्या प्रतिमेचे पुजन श्री. शशिकांत पानपाटील ग्रे.मुख्याध्यापक, श्री मनोहर पवार केंद्रप्रमुख साळवा यांनी केले. विद्यार्थी व शिक्षक यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक श्री दत्तात्रय पाटील पदवीधर शिक्षक यांनी केले तर आभार श्री.गणेश महाजन पदवीधर शिक्षक यांनी केले.