महात्मा फुलें मुळेच आपल्याला शिक्षणाचे दरवाजे खुले झाले.- प्रा. स्वरूप अहिवळे

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29नोव्हेंबर):- शतकानु शकते आपल्याला शिक्षण दिले गेले नाही. त्यामुळे आपली प्रगती झाली नाही म्हणून. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे दरवाजे आपल्यासाठी खुले केले. म. फुलेंचा आदर्श बाबासाहेबांनी घेतला. त्यामुळे आज आपल्या समाजाची प्रगती दिसत आहे. असे विचार मुधोजी काॅलेजचे प्रा. स्वरूप अहिवळे यांनी व्यक्त केले .ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ व प्रबुद्ध विद्याभवन आयोजित महात्मा फुले स्मृती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी संस्थाध्यक्ष सिद्धार्थ प्रबुद्ध विचार व्यक्त करताना म्हणाले. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्व ओळखले. त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. विद्येविना मती, निती, गती आणि वित्त गेल्यामुळे आपली अधोगती झाली आहे. भरपूर व दर्जेदार शिक्षण घेउन आपण आपली प्रगती केली पाहिजे. हेच आपल्या संस्था, शाळेची म.फुलेंना अभिवादन आहे.यावेळी प्रबुद्धच्या विद्यार्थ्यांनी अभिवादनपर भाषणे केली.

उपस्थितींचे स्वागत मुख्याध्यापक यशवंत कारंडे यांनी केले तर आभार वनिता मोरे/ कांबळे यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था महादेव गुंजवटे, जयश्री होनराव व संघमित्रा अहिवळे यांनी केली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED