बिरसा क्रांती दलाच्या वतीने बिरसा मुंडा जयंती व तंट्या मामा स्मृतिदिन साजरा

✒️सिद्धार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.30नोव्हेंबर):– मरसुळ दत्तनगर उमरखेड येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा व तंट्या मामा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी भव्य मिरवनूक काढण्यात आली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन,सास्कृतिक,आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. बिरसा क्रांती दलाच्या सर्व महिला सदस्यांनी पिवळया रंगाच्या साङ्या परिधान केल्या होत्या तर पुरुषांनी सुद्धा पिवळा रंगाचा नेहरु शर्ट घातला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा क्रांती दलाच्या फलकाचे पूजन व अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रबोधन सत्राला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती पिलवंड यांनी केले.

या वेळी बिरसा क्रांती दलाचे जि.उपाध्यक्ष शेषराव इंगळे,नारायनराव पिलवंड,सखारामजी तिळेवाड,राजु पेदेवाड यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डी.बी.अंबुरे यांनी बिरसा मुंडा व तंट्या मामा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.आदिवासी समाजाने शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन आपली प्रगती करावी.त्याच बरोबर व्यवसाय व शेती कडे लक्ष दिल्यास आपल्या कुंटूंबाची प्रगती होईल असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मरसुळ गावचे पो.पा.मा.उत्तमराव बनसोड होते.

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

तर प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच मनोज कुबडे,बंडू पाटील,प्रसाद धोंगडे,भागवत काळे,प्रदिप भुसारे,अनंता पांडे,हरणाबाई पेजेवाड,सिद्धार्थ धोंगडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी दगडू तिळेवाड,सुदाम तारमेकवाड,गणपत बगेवाड,विक्रम रणमले,लक्ष्मण वासेवाड,किसन तारमेकवाड राजु तारमेकवाड ,उत्तम रणमले, अनुसया तारमेकवाड,आशा तारमेकवाड,जान्हवी तिळेवाड,भाग्यश्री तिळेवाड,सोनुबाई टिळेवाड राधाबाई तारमेकवाड,शुभांगी रणमले,तान्हाबाई पिटलेवाड,वनिता तारमेकवाड,निकिता रणमले व समस्त दत्तनगर आदिवासी महिला व पुरूषांनी मौलाचे योगदान दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारत चौरे यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED