चिमुरात महात्मा ज्योतीबा फुले स्मृती दिन सोहळा

36

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.30नोव्हेंबर):-महात्मा ज्योतीबा फुले माळी समाज सेवा मंडळ चिमुरच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माळी समाज सेवा मंडळ अध्यक्ष भद्रीनाथ देसाई होते. यावेळी प्रमुख अतिथी गुरुकुंज आश्रम मोझरीचे आजीवन प्रसारक प्रा. अशोक चरडे, सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई चलपे, आशाताई मोहूर्ले, जेष्ट कार्यकर्ते वसंत वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा. अशोक चरडे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या मानवतावादी विचारांची महती पटवून देत तरुण पिढीस समाजहिताचे व समाज प्रगतीचे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच संध्याताई चलपे, आशाताई मोहूर्ले यांनी सुध्दा ज्योतीबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगाचे दृष्टांत देत महिला वर्गास पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचे सांगितले. तसेच महिला प्रतिनिधीच्या कविता देसाई यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची महती समाज बांधवांना आपल्या मार्मिक शब्दात व्यक्त केली. तसेच अनुप लोथे यांनी गीत गायनातून मानवधर्म सांगितला.

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशन बनकर, संचालन प्रा. संजय साखरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार यशवंत लोथे मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता बाळकृष्ण बोभाटे, तुषार काळे, नथु कडुकर, संजय देसाई, अक्षय मातीखांदे, संतोष वानखेडे, अतुल लोथे, केमदेव वाडगूरे, शुभम लोथे, लोमेश बनकर, अरविंद दानव, धीरज बनकर, कोरेकरआदीने सहकार्य केले.