प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून पी.डी.पाटील यांना सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर !….

37

🔸४ डिसेंबर, २०२२ रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे अल्पबचत भवन येथे वितरण होणार !…..

✒️धरणगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

धरणगांव(दि.30नोव्हेंबर):- धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना यावर्षी प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे.

पी.डी.पाटील यांची शैक्षणिक – सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रोटॉन शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काकडे सर, जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव सर, मिलींद निकम सर व संपूर्ण टीम कडून हा पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण ४ डिसेंबर २०२२ रविवार रोजी जिल्हाधिकार्यालय जळगांव येथील अल्पबचत भुवन येथे होणार आहे.

ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, धरणगाव प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, कार्याध्यक्ष सतीश शिंदे व मित्र परिवाराकडून पाटील यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. पी डी पाटील यांना यापूर्वी राज्यस्तरीय, खान्देश स्तरीय, जिल्हास्तरीय ७ पुरस्कार मिळालेले असून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी मला हा पुरस्कार जाहीर झाला की माझी कार्याची पावती आहे. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पी.डी.पाटील यांनी केले.

इण्डियाज फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स म्हणजे काय?