उद्योग क्षेञातील कोहीनूर कृष्णकुमार गोयल यांचा वाढदिवस आनंदा साजरा

91

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.30नोव्हेंबर):-नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने महाराष्टातील सुप्रसिदध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा ६९ वा वाढदिवस सत्तावीस नोव्हेंबर आहे. तो आनंदात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याशी मुक्तसंवाद करण्यात आला. त्यावेळी आपल्या मनसोक्त गप्पा म्हणाले की,”आपण समाजाचे देणं लागतो.

समाजातील सांस्कृतिक, काव्य,साहित्यिक,कला, क्रीडा, नाट्य,चिञकला, शिक्षण,धार्मिक इ.अनेक क्षेञात कार्य करत असताना मला अतिशय आनंद वाटतो, आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो. चांगल्या कामात आपल्याला हातभार लावण्याची संधी मिळते. याबद्दल मला समाधान वाटते. आपल्या आईवडिलांच्या संस्कारामुळे आपण आयुष्यातील एवढी वर्षे व्यवस्थित समाजासाठी काम करु शकलो. विविध माध्यमातुन काम करताना, अनेक मोठमोठी माणसे भेटत गेली. अनेकांच्या सहवासामुळे जीवनसमृध्द झाले.

आपल्या उत्पन्नातील निदान एक टक्का तरी भाग हा समाजाला दिला पाहीजे. आपल्या कुंटुंबाच्या साथीमुळे हा कोहीनूर उद्योजक लोकांपर्यंत पोहचविता आला. आज कोहीनूर ग्रुपच्या माध्यमातुन सातशे लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे. आजच्या युवकांना व युवा उद्योजकांनी आपल्या कामावर निष्ठा ठेवावी. चिकाटी व सचोटी आपल्या व्यावसायात असावी. ग्राहकांचा विश्वास कमविता आला पाहीजे. कोणते काम वेळेत व दर्जेदार करता आले पाहीजे.प्रामाणिकपणा तुमच्याजवळ असेल तर कोणत्याही संकटातुन आपण सहज बाहेर पडू शकतो.सातत्यापुर्वक कामाने आपल्या यश मिळत असते.”

यावेळी प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी नक्षञाचं देणं काव्यमंचची स्थापना करुन खेडोपाडी, वाडीवस्तीतील,तळागाळातील कवी कवयिञींना, साहित्यिकांना व्यासपीठ मिळवुन दिले आहे.गेली तेवीस वर्षे सातत्यपूर्वक ही चळवळ चालविणे सोपे नाही.त्यांच्या या कार्याचे कौतुक कृष्णकुमार गोयल यांनी कवी वादळकारांचे याप्रसंगी कौतुक केलेले आहे.या काव्यचळवळीशी मी सुध्दा गेली अनेक वर्षे जोडलो आहे.याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

https://www.purogamiekta.in/2022/11/30/56188/

त्यांच्या वाढदिवसाला नक्षञाचं देणं काव्यमंच,साई कला आविष्कार नाट्य संस्था,खडकी शिक्षण संस्था, पुणे, कोहीनूर ग्रुप, पुणे व साईराजे ग्रुप आॅफ कंपनी तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.