हिमालयन नाइटस ग्रुप चा साकोली मध्ये फ्रिडम कडून स्वागत

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

साकोली(दि.30नोव्हेंबर):- युवकांना तणाव मुक्त राहावं. यासाठी भारत भ्रमण करत असलेले हिमालयन नाईटस ग्रुप साकोली मध्ये आलं होते. त्याचा एक संदेश असं होते की युवा हा तणाव मुक्त राहावा आणि निरोगी राहावा. यासाठी त्यांनी रन अगेन्स्ट डिप्रेशन या ग्रुपची निर्मिती केली आणि त्यांनी चंदीगडवरून 10 नव्हेबर ला मुख्यमंत्री भवनामधून सुरवात केली. त्यामध्ये 14ते 45वयामधील तरुण तरुणी यांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये 4 मुलीचा सहभाग आहे आणि एक अपग तरुणाचा सहभाग आहे.

त्यांना हरियाणा ते कन्या कुमारी 8 हजार किलोमीटर चा अंतर तय करायचं आहे. न थांबता 24 तास त्यांना धावत जायचं आहे. एका मागे एक त्यांना धावायच आहे. त्याचा या कार्याला मानपूर्वक साकोली मध्ये स्वागत करण्यात आलं आहे. त्याचा टीम मध्ये असणारे संदीप आर्य, हितेश चव्हाण, लाडी केशव, याचं साकोली मधील फ्रिडम युथ फॉउंडेशन चे अध्यक्ष किशोर बावणे, निलेश सिंगोर, दिपक उपरीकर, दिनेश देशमुख, सतीश पवार, गोविंद वानखेडे, शैलेश सिंगोर, अंकित बावनकर या सर्वांनी त्याचं स्वागत केले

https://www.purogamiekta.in/2022/11/30/56223/