आता अभिनेत्री श्रद्धा रानी शर्मा अमेरिकेत आपले नृत्य कौशल्य दाखवणार

94

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.3डिसेंबर):- न्यूयॉर्कमध्ये 27 डिसेंबर 2022 रोजी ‘ख्रिसमस पार्टी आणि रेड कार्पेट अवॉर्ड’चे आयोजन करण्यात आले आहे.ज्यामध्ये मालिका आणि चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री, डान्सर आणि ‘बिग बॉस’ फेम श्रद्धा रानी शर्माला ‘डान्स शो’साठी भारतातून बोलावण्यात आले आहे.

जिथे श्रद्धा तिचे नृत्य कौशल्य दाखवणार आहे. याबद्दल श्रद्धा रानी शर्मा सांगतात,”ही खूप चांगली ऑफर होती,भारतीय वंशाचे अनेक लोक या संस्थेशी जोडले गेले आहेत.

मला नेहमीच देश-विदेशातून शोच्या ऑफर मिळतात आणि लोकांच्या थेट प्रतिक्रिया कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यातली मजा वेगळी आहे.मला लाइव्ह परफॉर्मन्स आवडतो.असा अनुभव खूप मनोरंजक आणि संस्मरणीय असतो.”

https://www.purogamiekta.in/2022/12/03/56394/