नागपूरच्या शेकडो महिलांनी समजून घेतली श्रमिक एल्गार

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4डिसेंबर):- नागपूर येथील बचत गट, मोलकरीण संघटना, बचत गट महासंघाच्या दीडशेचेवर महिलांनी चितेगाव (मुल जिल्हा चंद्रपूर) येथे येऊन श्रमिक एल्गार संघटनेचे कार्य आणि कार्यपद्धती समजून घेतली.

श्रमिक एल्गार ही मागील दोन दशकापासून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात कष्टकरी महिला, शेतकरी, शेतमजुरांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी कार्य करणारी संघटना आहे.

या संघटनेची कार्यपद्धती कार्य आणि तत्व समजून घेण्यासाठी आज(3 डिसेंबर) गोसीखुर्द प्रकल्प संघर्ष समितीचे नेते विलास भोंगाडे यांचे नेतृत्वात दीडशेचेवर महिला चितेगाव येथील श्रमिक एल्गार कार्यालयात आल्या आणि दिवसभर श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते विजय सिद्धावार, अमर कड्याम यांचे माध्यमातून संघटनेची कार्य आणि कार्यपद्धती समजून घेतली.

अशा पद्धतीचे कार्य सर्व जिल्ह्यात झाल्यास गरीब कष्टकर्‍यांना न्याय मिळेल, त्यांचे हक्क अबाधित राहतील असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला.

https://www.purogamiekta.in/2022/12/03/56394/