छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्य विधानाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन

31

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

बीड(दि.4डिसेंबर):-छत्रपती शिवरायांबद्दल अपमान जनक वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी योगाभवन येथे सर्वपक्षीय, सर्वधर्मीय व सर्व सामाजिक संघटनाच्या बैठकीत पुसदकर शिवप्रेमींनी रास्ता रोको आंदोलनाच्या आयोजना बाबत आज एकमताने निर्णय घेण्यात आला.

जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपली अस्मिता मानतो आपला आयडॉल मानतो आणि भारताची ओळख भारताचे नेते जेव्हा जगाच्या पाठीवर फिरतात तेव्हा तेव्हा ते भारताची ओळख मी गौतम बुद्धाच्या भारतातून आलो, छत्रपती शिवरायांच्या देशातून आलो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशातून आलो अशी ओळख द्यावी लागते असे या महामानवांचे महान कार्य संपूर्ण जगात अजरामर असल्याने भारत देशाची ओळख आहे.

अशा छत्रपतींची बदनामी का व्हावी का…? जाणीवपूर्वक त्यांचा उल्लेख कुठल्याही व्यक्तीशी करण्यात यावा? यावर आता संपूर्ण शिवप्रेमींनी विचार करण्याची गरज आहे. छत्रपती नसते तर या जगाची काय अवस्था झाली असती हे सांगण्याची गरज नाही परंतु असे असतानाही जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल आक्षेपार्य बोलून शिवरायांचा अपमान करण्याचे आगाऊ धाडस केले जाते. यावाईट वृत्तीस , असंविधानीक प्रवृत्तीस वेळीच उत्तर देणे, निषेध, त्याचा संविधानीक मार्गाने प्रतिकार करणे, आपण जिवंत आहोत हे दाखवून देण्यासोबतच अशा वाईट प्रवृत्तीला वेळीच लगाम लावण्याच्या दृष्टीने व इतरांनी अशी पुनरावृत्ती करू नये.

यासाठी निषेध नोंदविणे गरजेचे असल्याच्या भावना यावेळी उपस्थित सभेमध्ये शिवप्रेमींनी बोलून दाखवल्या. त्यादृष्टीने मंगळवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने एक शिवप्रेमी म्हणून शिवरायांचे मावळे म्हणुन रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सर्वांच्या उपस्थितीत ठरविण्यात आले.या निषेध रास्ता रोको आंदोलनाला हजारोच्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवप्रेमींनी केले आहे.