उमरखेड परिसरातील धोकादायक व्यक्ती गजानन अशोक डहाळे

27

🔹सन्हाईत गुंड यास एक वर्षासाठी केले स्थानबध्द

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 4डिसेंबर):-पोलीस स्टेशन उमरखेड परिसरातील धोकादायक व्यक्ती गजानन अशोक डहाळे वय 24 वर्षे, रा. सराफा लाईन, गोचरस्वामी वार्ड उमरखेड जि. यवतमाळ यास मा. जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांचे अंतर्गत जिल्हा कारागृह यवतमाळ येथे एक वर्षासाठी केले स्थानबध्द.

आदेशाने एमपीडीए कायद्या पोलीस स्टेशन उमरखेड परिसरातील सन्हाईत गुंड गजानन अशोक डहाळे वय 24 वर्षे, रा. सराफा लाईन, गोचरस्वामी वार्ड उमरखेड याचे विरुध्द पो.स्टे. उमरखेड येथे सन 2017 पासुन शरीर व संपत्ती विषयक गुन्हे तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणे, दारुचे नशेत सार्वजनिक शांतता भंग करणे, कट करुन खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्र बाळगणे, अश्लिल शिवीगाळ करणे, सामाजिक सलोखा बिघडविणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

त्याचे या गुन्हेगारी कारवायामुळे उमरखेड शहर व परीसरातील जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती व त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परीणाम होत होता. त्याचे विरुद्ध आजपावेतो केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा त्याचेवर कोणताही परिणाम झाला नाही उलट तो वरीलप्रकारचे गुन्हे करीत होता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहावी याकरीता सदर इसमाविरुद्ध अमोल माळवे ठाणेदार पो.स्टे. उमरखेड यांनी धोकादायक व्यक्ती या सदराखाली पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांचकडे सादर केलेल्या MPDA च्या प्रस्तावावर मा. जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांनी सदर गजानन अशोक डहाळे वय 24 वर्षे, रा. सराफा लाईन, गोचरस्वामी वार्ड उमरखेड याचे विरुद्ध स्थानबध्द करण्याचे आदेश दिनांक 102/12/2022 रोजी निर्गमीत केल्याने गजानन अशोक डहाळे वय 24 वर्षे, रा. सराफा लाईन, गोचरस्वामी वार्ड उमरखेड यास दिनांक 02/12/2022 रोजी ताब्यात घेवून यवतमाळ जिल्हा कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा. श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, आदीत्य मिरखेलकर सहा. पोलीस अधीक्षक, प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली. अमोल माळवे पोलीस निरीक्षक, पोहवा विजय पतंगे, पोना नितीन खवडे, पो.स्टे. उमरखेड, पोहवा राहुल गोरे स्थागुशा यवतमाळ यांनी पार पाडली आहे.