कबड्डीचा खेळाडू असल्याने राजकारणातले डाव जिंकता आले – ना.गिरीश महाजन

30

🔹राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन : क्रीडाप्रेमींची तुफान गर्दी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4डिसेंबर):-कोणत्याही सांघिक खेळामुळे नेतृत्व गुण विकसित होतो. त्याचा अनुभव मला महाविद्यालयीन जीवनात आला. कारण, मी सुध्दा कबड्डी, कुस्ती आणि हॉलिबॉलचा खेळाडू होतो. मात्र, कबड्डीमुळे राजकारणात आलो. त्यामुळे राजकारणातले सगळे डाव जिंकता आले. राजकारणात कोणाची टांग खेचायची. कुणाला बाय द्यायचा. कोणाला चितपट करायचे. हे कबड्डीमुळे करता आले, अशी कबुली राज्याचे ग्रामविकास व क्रीडामंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिली.

गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट व क्रीडाप्रेमी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकारातून शहरातील क्रोदी रोड येथे ३ ते ६ डिसेंबर दरम्यान मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ४९ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ना.गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे, सहकार्यवाह आस्वाद पाटील, असोसिएशनचे परभणी जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपुडकर, आ. मेघनाताई बोर्डीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, युवा उद्योजक राजेभाऊ फड, युवा उद्योजक सुनील भैया गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, पंचप्रमुख लक्ष्मण बेल्लाळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे,पालम प्रभारी माधवराव गायकवाड, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंतराव मुंडे, सचिव अॅड. मिलिंद क्षिरसागर, तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.गिरीष महाजन म्हणाले की, राजकारण सुध्दा खेळाचा आखाडा असतो. तिथं तुम्हाला सगळे डावपेच टाकता आले पाहिजेत. मात्र, प्रतिस्पर्धीच्या डावांना जर चितपट करता आले तर तुम्ही राजकारणात यशस्वी होता. ते तंत्र मला जमले म्हणून मी गेल्या ३० वर्षापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळात आहे.याप्रसंगी कबड्डी खेळातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल काही नामंकित व्यक्ती आणि देहदान निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ सातपुते यांचा येथोच्छित सन्मान ना.गिरीश महाजन व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

दररोज सायंकाळी ५ ते १० वेळेत खेळविल्या जाणाऱ्या या चार दिवसीय कबड्डी स्पर्धेत राज्यभरातले तब्बल ५० संघ सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ८०० खेळाडू आपले गुण आणि कौशल्य प्रदर्शित करीत आहेत. खेळाडूंसह संघ व्यवस्थापक, पंच व अधिकारी अशा जवळपास १००० लोकांच्या निवास व भोजनाची उत्तम सोय मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानने केली आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे आणि सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते यांनी केले. तर आभार प्रतिष्ठानचे सचिव अॅड.मिलिंद क्षिरसागर यांनी मानले. याप्रसंगी मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान, राष्ट्रीय समाज पक्ष, गुट्टे (काका) मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, विविध विभागाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच राज्यभरातून आलेले सर्व खेळाडू, संघव्यवस्थापक, पंच, जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी व क्रीडाप्रेमी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माणिक नागरगोजे, वैजनाथ टोले, राधाकिशन शिंदे, सत्यपाल साळवे, पिराजी कांबळे, इकबाल चाऊस, इंतेसार सिद्दीकी, खालेद शेख, सुमित कामत, सतिश घोबाळे, बाबा पोले, हनुमंत लटपटे, सचिन जाधव, प्रभाकर सातपुते, गणेश मिजगर, अश्विन कदम, दुर्गेश वाघ, शाम ठाकूर, गोपी नेजे, अभिजीत चक्के, सचिन राठोड, शंकर मुंढे, ऋषिकेश बनवसकर, महादेव लटपटे, तुकाराम मुंढे, विठ्ठल लटपटे, राजेंद्र चव्हाण, धनराज मुंढे, चैतन्य पाळवदे, भगवान राठोड, जयदीप फड, अंकुश राठोड, पांडूरंग आंधळे, राजकुमार राठोड, विनोद कुलकर्णी, सुभाष साळुंके, भरत मुंढे, शेख रोशन यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदधिकारी विशेष ​परिश्रम घेत आहेत.

*म्हणून तुम्हाला क्रीडामंत्री केलं असावं – आ.डॉ.गुट्टे*
तुम्ही चाणाक्ष राजकारणी आहात. जळगावच्या राजकारणात तुमची कुस्ती आणि कबड्डी नेहमी सुरु असते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला क्रीडामंत्री केलं असावं, असे आ.डॉ.गुट्टे म्हणाले तेव्हा उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ उडाला. त्यास ना.गिरीश महाजन यांनीही टाळ्याची दाद दिली.

ना.महाजन यांचे साधेपणा व आपुलकीचे दर्शन औरंगाबाद येथील कार्यक्रम करुन गंगाखेड येथे येण्यास ना.महाजन यांना थोडा उशिर झाला. मात्र, कार्यक्रमानंतर त्यांनी शाही जेवणास फाटा देऊन बेसण, भाकरी, ठेचा, शेपू, मेथी, दोडका, पापड, शिरा आणि लोंणच्यावर ताव मारला. आ.डॉ.गुट्टे यांच्या राम-सीता निवास या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या भोजन पंक्तीस ना.गिरीश महाजन यांच्यासह आ.डॉ.गुट्टे, आ.मेघना बोर्डीकर, उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे, राजेभाऊ फड,हनुमंत मुंढे, अॅड.मिलिंद क्षिरसागर, बाबा पोले, हनुमंत लटपटे, जयशिल मिजगर, प्रभाकर सातपुते, बाळासाहेब पवार उपस्थित होते. यावेळी ना.महाजन यांनी आ.डॉ.गुट्टेंची आपुलकीने विचारपूस करुन विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली.

https://www.purogamiekta.in/2022/12/03/56394/

होय, दिले पाच कोटी – ना.महाजन
विधानसभा क्षेत्रातील गुणी व मेहनती खेळाडूंना आधुनिक सोई-सुविधा मिळाव्यात, यासाठी इंडोर स्टेडियम आवश्यक असल्याचे सांगत आ.डॉ.गुट्टे यांनी आपल्या भाषणावेळी क्रीडामंत्र्यांकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्याची नोंद घेऊन होय, दिले पाच कोटी अशा शब्दात ना.गिरीश महाजन यांनी निधीची घोषणा करुन तत्परता दाखविली.