जिल्हा परिषद मधील शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांना आदिवासी एकस्तर वेतनश्रेणी

34

🔸आमदार कपिल पाटील यांना दिले निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.5डिसेंबर):- आदिवासी क्षेत्रात सेवा बजावलेले शिक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना कोर्टाचे आदेश असूनही जिल्हा परिषद चंद्रपूर केवळ मुख्यालय वास्तव्य करून राहत नसल्याचे कारण दाखवून एकस्तर वेतन श्रेणी व प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित ठेवलेले आहे.त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना आदिवासी एकस्तर वेतनश्रेणी मिळावी या मागणीचे निवेदन आमदार कपिल पाटील यांना देण्यात आले.

आदिवासी एकस्तर वेतनश्रेणी संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना वारंवार निवेदने चर्चा व आंदोलन करून मागणी मागण्यात आली.परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी शासन निर्णयाचा उल्लेख करत एकस्तरचा लाभ देण्यास नकार दर्शविला व तसे पत्रही काढले‌.या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी कंटेम ऑफ कोर्ट करून जिल्हा परिषद चंद्रपूरला वेठीस धरले असता त्यातील ५६ लोकांना प्रशासनाने याच शासन निर्णय दिनांक ६ ऑगस्ट २००२ च्या शासन निर्णयाप्रमाणे लाभ दिला व त्यांना कुठलेही पडताळणी समिती नेमली नाही वा वास्तव्याच्या प्रमाणपत्राची अट घातली नाही. त्यांना सरसकट लाभ देण्यात आला.

जिल्ह्यातील २३३ शिक्षक-आरोग्य कर्मचारी नी WP 3895 माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या दिनांक १९ सप्टेंबर २०२२ या निर्णयानुसार शासन निर्णयाप्रमाणे कुठल्याही अटी व शर्ती न ठेवता आदिवासी क्षेत्रात सन २००२ पासून कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता रुपये पंधराशे व नजीकच्या पदाची एक तर वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिलेले आहेत. तरीसुद्धा जि प चंद्रपूर केवळ मुख्यालय राहत नसल्याच्या कारणाने इतर पत्राचा उल्लेख करून वारंवार पात्र असलेल्या कर्मचाऱ्यास एकस्तर वेतन श्रेणी पासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे या अन्यायाचा विरोध करण्यासाठी व सर्वांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी यासंबंधी शिष्टमंडळाने आमदार कपिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात शिक्षक भारतीच्या मेळाव्यात आमदार कपिल पाटील आले असता त्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे किंवा चर्चेद्वारे हा मुद्दा मी सभागृहात उपस्थित करणार असे आश्वासन आमदार कपिल पाटील यांनी दिले. सदर निवेदन देताना शिक्षक भारतीचे विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,डॉ.सुधीर मोते,उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर हटवार, योगेश्वर नागोसे उपस्थित होते.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अजय बोंडे,कैलास उरकुडे,दिवाकर कुमरे,रंजना तडस आदींचा समावेश होता.