गंगाखेड चे तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या संघमताने वाळू उपसा होते.तक्रार दाखल

45

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5डिसेंबर):-येथील दिवस रात्र गोदावरी गंगा च्या पात्रेतून वाळू उपसा सतत सुरु आहे सध्या वाळू धक्का लिलाव नसून सुद्धा गोदवरी पात्रेतून वाळू उपसा चालू असून हा वाळूचा उपसा तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या संघमताने चालू आहे अशी तक्रार जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी येथे करण्यात आली असून सदरील वाळू उपसा करताना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना नोटकँप कॅमेरा मध्ये फोटो काडून पाठवले असून वेळोवेळी फोन करून कळवले असून वॉट्सअप वर पण नोटकँप कॅमेरा मध्ये फोटो पाठवण्यात आले.

परंतु बेकायदेशीर वाळू उपसा करून तस्करी करणाऱ्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात येत नसून अधिकारी व कर्मचारी यांच्या संघमताने चालत असल्याची तक्रार करण्यात आली असून वरील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यलया समोर बेकायदेशीर वाळू उपसा विरोदात अमरण उपोषण करण्यात येईल अशी तक्रार करण्यात आली असून या तक्रारी वर शाम गौतम पंडित राहणार गंगाखेड यांची स्वाक्षरी आहे.