जनतेतून सरपंच तर सदस्याला महत्व काय? आडीच वर्ष सरपंचावर कुणाचाच वाच न्ह्याय!

29

✒️शेख आतिख(तलवाडा तलवाडा)

गेवराई(दि.6डिसेंबर):-तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास ७४ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत असुन दोन डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडनुकी मध्ये सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आसल्याने आणेकजन आपले नशीब आजमावत आहेत तर आणेक ठिकाणी मातंबर या भावनेतून उभे आहेत की आडीच वर्ष सदस्यांना सरपंचावर अविश्वास ठराव आनंता येत नाही. मंग आपलीच दिवाळी. गावचे मात्र दिवाळे? आणेक इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असुन आणेक तडजोडीतुन सरपंच पदासाठी अनेकांची महत्त्वकांक्षा समोर येत आहे.

व्हायचं तर सरपंच, सदस्याला कोण विचारतय ! अशी ऊदगारत्मक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निवडणूक असलेल्या गावांमध्ये सरपंच पदाकरिता इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेक गावात दोन – तीन चार आसे पॅनल दिसुन येत आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असलेले आणेक व पॅनल प्रमुख सदस्य उभे करतांना तुम्हाला आम्ही उपसरपंच करू या शाब्दिक आधारावर पॅनल मध्ये घेत सदस्याचा कोठा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले असुन या गोलगप्यात आणेकांना यश आल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. गेवराई तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीची या टप्प्यात निवडणूक होत आहे. खुला, ओबोसी आरक्षण असलेल्या गावात सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण असलेल्या गावांमध्ये एकाच एक लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. गावातील वर्चस्व कायम रहावे ग्रामपंचायत आपल्याच हातात राहावी या साठी गाव पुढा-याकडून प्रयत्न सुरू आहेत. गेवराई तालुक्यातील होत आसलेल्या ७४ ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच रंगत होणार आसल्याचे चिन्ह स्पष्ट दिसुन येत आहे, विध्यमान शासनाच्या जनतेतून सरपंच निवडीच्या धोरणानुसार ग्रामपंचायत सदस्यांना पूर्वीप्रमाणे महत्त्व राहिले नसल्याने सदस्य पदासाठी उमेदवार तयार करतांना पॅनल प्रमुखाची पंचायत होतांना दिसुन आली. तर मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी तालुक्यातील आजी माजी भावी लोकप्रतीनिधिंनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसुन येत आहे.