किंगसन ग्लोबल स्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

28

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.6डिसेंबर):-किंगसन ग्लोबल स्कूल गेवराई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत त्यांना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्याम चाळक सर, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वेदिका चाळक मॅडम सह आदी उपस्थित होते.

कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे सचिव श्याम चाळक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्या काळी समाजात अस्पृश्यता, जातीभेद खूप मोठया प्रमाणात होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांना वर्गात बसू दिले जायचे नाही,दारात बसून त्यांनी शिक्षण घेतले. भेदभाव केला जात होता त्याविरुद्ध त्यांनी चळवळ उभी केली. दलित लोकांनाही समान वागणूक मिळावी यासाठी लढा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शालेय जीवनात १८ तास अभ्यास करायचे.भारतीय संविधानाचे शिल्पकार होत.

हिंदू कोड बीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरचा वारसा हक्क दिला. तसेच महिलांना पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार दिला गेला. त्यांना ‘भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी समता, बंधुता व न्याय हा मूलमंत्र दिला व शिका व संघटित व्हा व संघर्ष करा ह्या त्रिसूत्री सांगितली.विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ह्या मुलमंत्राचा अवलंब करून भारताला विकसित राष्ट्र घडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करता येतील याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थी निपून कांडेकर, यशराज गव्हाणे, ज्ञानेश्वरी जावळे, वेदिका पराड, भारत चाळक, श्रद्धा माळकर तसेच आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या भाषणातून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती भाग्यश्री पाठक यांनी तर आभार श्रीमती राऊत मिस यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.