डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाने पाहिलेले मरण- अपेक्षा एन. पिंपळे

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.६ डिसेंबर):- रोजी संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्याला पुष्पचक्र अर्पन करुन संघटनेच्या अध्यक्ष मान. अपेक्षा पिंपळे ह्या म्हणाल्या की सामान्य मानसे वाटेल तेव्हा मरतात. ती केव्हा जन्माला येतात आणि मरतात ह्याकडे कोणाचेही लक्ष नसते; पण असामान्य पुरुषाचे जिवन जसे लोकोत्तर तसे त्यांचे मरणही लोकत्तर असते.

किंबहूना, महापुरुषांच्या जन्मापेक्षा त्याचे मरणच मोठे असते. १८९१ साली डॉ. आंबेडकरांचा जन्म जेव्हा लष्करातल्या भिमाई आणि सुभेदारांच्या पोटी झाला तेव्हा शेजारच्या चार दोन माणसांपेक्षा ती गोष्ट कोणालाही माहित नसेल. पण भारताच्या राजधानीत त्यांचा जिवनग्रंथ जेव्हा पूर्ण झाला तेव्हा साऱ्या जगाने त्यांच्यासाठी अश्रु ढाळले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळपास दहा लाख लोक होते. त्यांची अंत: करणे रक्तबंबाळ झालेला हा दिवस. त्यांचा मृत्यु एवढा मोठा होता की महापूरुषानी त्यांचा हेवा करावा. डॉ. आंबेडकरांच्या मृत्युची वार्ता ऐकुन तर अस्पृश्य ढसढसा रडले असतील.

आजतागायत अनेक मोठी माणसे मरण पावली असतील, परंतू ज्यांच्या मृत्युने कोट्यावधी लोकांची अंत:करणे रक्तबंबाळ झाली आणि कोट्यावधी नेत्रांमधुन अश्रूंच्या धारा वाहील्या असे मरण म्हणजे आंबेडकरांचेच. मृत्युमुळे दु:ख होणे सहाजिकच आहे; पण डॉ. आंबेडकरांच्या मृत्युमुळे त्यांच्या अश्पृश्य समाजात जे दुःख झाले त्याचे शब्दांनी वर्णन सुध्दा करणे अशक्य आहे.आज अभिवादन करण्यासाठी पुष्पचक्र अर्पन करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत रामटेके, प्रतिक्षा पाटील, धिरज रासेकर, आदित्य धोटे, कोमल बोरकर, आकांक्षा बोढे, सिमा मेश्राम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.