शिक्षण क्षेत्रात खळबळ; केजमधील मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

35

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.7डिसेंबर):-केज तालुक्यातील एका शाळेवरील मुख्याध्यापकांनी बीड येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोरील हॉटेलच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. ५ ) रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भारत सर्जेराव पाळवदे असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे.

समजलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री ११ वाजत काही व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोरील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह दिसला अन् एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. परंतु हा व्यक्ती कोण? असा प्रश्न पोलीस समोर होता. आज सकाळी मृताची ओळख पटली असून, भारत सर्जेराव पाळवदे ( ४५, रा. सासुरा, ता. केज ) असे मृताचे नाव आहे.