श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली…..

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.7डिसेंबर):-श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम एस. टी. यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम एस. टी., राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश संघटक – सचिव अ‍ॅड. राजू भोसले, प्रा. महेश सोनवणे, प्रा. जितेंद्र बनसोडे, प्रा. रमेश बोबडे, प्रा. पवार आर. जी., प्रा. रणवरे,प्रा. साळुंखे, संतोष लोखंडे, गणपतराव राजेमाने, दिलीप शिंदे,धनाजी कोले, राजेंद्र अडागळे, राजू कलढोणे, इर्शाद आतार, हणमंत भोसले हे प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ देणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली महाविद्यालया च्या वतीने वाहण्यात आली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश आचरणात आणून भारतीय राज्यघटनेच्या संरक्षण, संवर्धनासाठी प्रतिबद्ध होणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचे, देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झाले. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे. डॉ. बाबासाहेब यांचे विचार जोपासून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे हीच खरी बाबासाहेब यांना आदरांजली ठरेल.