नेकनुर स्त्री रूग्णालयातील बंद केलेली महात्मा ज्योतीराव फुले योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी डाॅ.सुरेश साबळे यांना निवेदन

52

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.7डिसेंबर):-तालुक्यातील नेकनुर येथील बंद केलेली महात्मा ज्योतीराव फुले जन योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना(MJPJAY &MPJAY ) चुकीच्या माहितीच्या आधारे अन्यायकारक रित्या बंद करण्यात आली असून ती पुर्ववत सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलनाचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर,मुक्तपत्रकार संतोष ढाकणे यांनी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर,सीएस. डाॅ.सुरेश साबळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव,आरोग्यमंत्री,सचिव आरोग्य मंत्रालय यांना दिला आहे.

सविस्तर माहीतीस्तव
__
नेकनुर ता.जि.बीड येथील स्त्री रूग्णालय बालाघाटावरील गोरगरीब रूग्णांसाठी आरोग्यसुविधेचे वरदान असून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत (MJPJAY & PMJAY) लाभ मिळत होता मात्र दि.१८ ऑक्टोबर २०२२ रोजी पासुन CMO mumbai डाॅ.सुशांत पटवर्धन यांनी संपूर्णपणे शहानिशा न करताच केवळ गैरसमजातून या योजनेंतर्गत लाभ बंद करण्यात आलेला आहे.

डाॅ.आशिलाक शिंदे वैद्यकीय अधिक्षक स्त्री रूग्णालय नेकनुर यांच्या विनंतीची दखल नाही
___
डाॅ.सुशांत पटवर्धन यांनी नेकनुर स्त्री रूग्णालय येथील महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ बंद केल्यानंतर डाॅ.आशिलाक शिंदे वैद्यकीय अधिक्षक स्त्री रूग्णालय नेकनुर यांनी संबधित प्रकरणात खुलासा सादर केलेला आहे तसेच याविषयी दि.७ नोव्हेंबर आणि दि.२१ नोव्हेंबर रोजी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर तसेच जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांना लेखी पत्रव्यवहार करून योजना पुर्ववत सुरू करण्यात यावी यासाठी विनंती केलेली असून त्याची दखल घेतल्याचे दिसून येत नाही.

सोमवार रोजी जिल्हारूग्णालय बीड येथे ठीय्या आंदोलन
__
अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील नेकनुर मोठी बाजारपेठ असून बालाघाटावरील ४०-५०,गावातील लोकांना नेकनुर येथील स्त्री रूग्णालयाचा आधार असुन बीडला जिल्हारूग्णालयात जाण्यासाठी २५ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. त्यामुळेच गोरगरीब रूग्णांची गैरसोय होत असुन त्यासाठी दि.१२ डिसेंबर वार सोमवार रोजी जिल्हारूग्णालय बीड येथे ठीय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना देण्यात आले आहे.

https://www.purogamiekta.in/2022/12/07/56669/