रक्तदान करून केले बाबासाहेबांना कोटी… कोटी अभिवादन

🔹भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांचा उपक्रम

🔸भिम टायगर सेनेचे प्रत्येक तालुक्यात होणार रक्तदान शिबीर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.8डिसेंबर):-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भिम टायगर सेनेचे सरसेनापती तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी दि. ६ डिसेंबर रोजी 11 वेळा रक्तदान करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन केले.

भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांचा मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.

वैज्ञानिक युगात मानवाच्या कल्याणासाठी, समाज हितासाठी युवकांनी जिवन झिजवले पाहिजे. भिम टायगर सेनेच्या वतीने जिल्ह्यातील युवकांना संघटित करून स्वयंरोजगार, तांत्रिक कौशल्य विकास, विविध प्रशिक्षण उपलब्ध करून कौटुंबिक जीवन समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवले जाते. रक्तदान हे वैयक्तिक आरोग्याचे विश्लेषण करण्यास मदत करते. नवीन रक्त निर्मिती करून निरोगी शरीरासाठी फायदेशीर असते.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED