संदीप महाडीक लिखित “बावीस प्रतिज्ञा : एक प्रज्ञाशोध” या पुस्तकाचे प्रकाशन

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.8डिसेंबर):- फुले, शाहु, आंबेडकर चळवळीतील लेखक, समीक्षक, भाष्यकार संदीपजी महाडीक यांच्या लेखणीतुुन साकारलेल्या 22 प्रतिज्ञा एक प्रज्ञाशोध या 22 प्रतिज्ञांची काल, आज व भविष्यात माणसाच्या हितासाठी लागणारी गरज सांगणा-या पुस्तकाचे विमोचन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर साहेब यांचे हस्ते व 22 प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक व आधारस्तंभ अरविंदजी सोनटक्के सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्जाभुमी, चैत्यभुमी दादर येथे संपन्न झाला.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, प्राचीन बौद्ध लेणी संशोधन व संवर्धन व 22 पतिज्ञा अभियान या सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवुन संदिप महाडीक यांच्या या नव्या पुस्तकाला सदिच्छा दिल्या. सर्व सुजाण, अभ्यासू, वाचकांनी हे पुस्तक खरेदी करून वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही ठेवावे असे आवाहन 22 प्रतिज्ञा मुख्य प्रचारक भीमराव मोरे तसेच प्रदीप जाधव यांनी केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED