जि.प.शाळा थोरगव्हाण येथे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !….

🔸सत्यशोधक समाज संघाचा अनोखा उपक्रम!….

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(निलेश धर्मराज पाटील)

यावल(दि.8डिसेंबर):-यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश धर्मराज पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे होते. येत्या ११ डिसेंबर २०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ येथे होणार आहे. सत्यशोधक समाज संघ जिल्हा समन्वय समितीचे प्रमुख पी.डी.पाटील, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक अध्यक्ष विजय लुल्हे यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य घराघरापर्यंत पोहचायला हवे म्हणून सत्यशोधक समाज संघाकडून या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांपर्यंत ज्योतिरावांचे कार्य पोहोचवावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील मुलांनी उत्साहाने रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग भाग घेतला. रंगभरण स्पर्धेत – प्रथम अर्चना गोपाल पाटील, द्वितीय रिंकू विनोद भालेराव, तृतीय प्रेमसागर सुनिल सुखाडे,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम उत्कर्षा महेंद्र चौधरी, द्वितीय गायत्री भगवान बेदारे, तृतीय छाया सुनिल पाटील. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेकडून ग्रंथ व लेखणी भेट देण्यात आली.याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवने सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवने, पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश धर्मराज पाटील यांनी मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED