पिंप्राळा येथील बालमोहन मराठी शाळेत हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न

28

🔹सत्यशोधक समाजातर्फे विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जळगांव(दि.9डिसेंबर):-कै.गि.न.चांदसरकर बालमोहन मराठी शाळा, पिंप्राळा (ता .जळगाव ) येथे सत्यशोधक समाज संघ, जळगाव आयोजित हस्ताक्षर स्पर्धा शुक्रवार ९ डिसेंबर २०२२ रोजी शालेय स्तरावर इयत्ता ४ थी वर्गाची घेण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.मनिषाताई कानडे होत्या. प्रस्तावना स्पर्धा प्रमुख तथा अधिवेशन आयोजन समिती सदस्य विजय लुल्हे यांनी केली आणि शिक्षकांना संमेलनासाठी उपस्थितीचे आवाहन केले.रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन दुसरे कुऱ्हा पानाचे तालुका भुसावळ येथे संपन्न होत आहे.

अधिवेशनाच्या औचित्याने विजय लुल्हे जिल्हा आयोजन समिती सदस्य यांच्या कल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधकीय अलौकिक कार्य विद्यार्थी व कुटूंबियांपर्यंत पोहोचून प्रचार व प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानवी मुल्यांची जोपासना होऊन ते सत्यशील व निर्भय व्हावे. देशप्रेम व समाजाभिमुख होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा या व्यापक उद्दिष्टांसाठी स्पर्धा शालेय स्तरावर आयोजित करण्यात आल्या.स्पर्धेच्या व्यापकतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्य अध्यक्ष अरविंद खैरनार व सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांचे मार्गदर्शन व सत्यशोधक समाज संघ जिल्हा समन्वय समिती प्रमुख पी.डी.पाटील सर यांचे अमूल्य सहकार्य मिळाले.स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

*सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे* : – * प्रथम क्रमांक : – कु.मनस्वी अमोल तायडे * द्वितीय क्रमांक – कु.युक्ती संभाजी पाटील
* तृतीय क्रमांक ( विभागून ) – वरद ज्ञानेश्वर सुर्यवंशी व कु.श्रद्धा कैलास मालखेडे. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे पेपर्स वंदनाताई भिरुड यांनी तपासून मुल्यांकन केले.स्पर्धेचा निकाल मुख्याध्यापिका कानडे यांनी घोषित करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.स्पर्धेच्या संयोजनासाठी वंदनाताई भिरुड ,स्मिताताई शिसोदे शिक्षकांनी व स्पर्धा यशस्वितेसाठी जितेंद्र झांबरे, नितीन वंजारी यांनी अमूल्य सहकार्य केले.प्रारंभी प्रस्तावना स्मिता शिसोदे यांनी व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केतन सोनवणे यांनी केले.

https://www.purogamiekta.in/2022/12/09/56757/

राजकारण धर्मावर असावे की समस्येवर?