नागेश काॅंम्प्युटर सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

27

🔹रक्तदानासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा — ॲड.आशिष देशमुख
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
_________________________
पुसद(दि.9डिसेंबर):-तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात अनेक वेळा रक्ताचा तुटवडा जाणवत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तदान होणे आवश्यक आहे रक्तदाना विषयी अनेकांच्या मनात खूप गैरसमज असतात त्यामुळे ते सहजासहजी रक्तदान करण्यासाठी तयार होत नाहीत समाजात असणारे हे गैरसमज दूर करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांनी नुकतेच केले. स्थानिक नागेश कम्प्युटर सेंटर व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरा प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेडिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश चिद्रवार एचडीएफसी बँकेचे ऑपरेशन मॅनेजर विपुल बोरकर हे उपस्थित होते.एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन व्यक्तींना लाभ होऊ शकतो अनेकांचे जीवन वाचविण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व असले तरी केवळ 35 टक्के लोकच स्वच्छने रक्तदान करतात हे प्रमाण वाढविण्यासाठी नागेश कम्प्युटर सेंटर व एचडीएफसी द्वारे आयोजित केलेल्या शिबिराप्रमाणे उपक्रम होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ.चिद्ररवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश कम्प्युटर सेंटरचे संचालक मिलिंद हट्टेकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल हट्टेकर ,सुभाष काळे ,विकेश जाधव, शुभम वाळले, सौ राजश्री भोयर ,सौ केवटे मॅडम यांनी परिश्रम घेतले.या रक्तदान शिबिरास विद्यार्थी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला ॲड. आशिष देशमुख यांच्या भाषणाने प्रभावित होऊन काही विद्यार्थी रक्तदानास त्वरित तयार झाले. शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू म्हणून ऑफिस बॅगचे वितरण करण्यात आले.