कांकरिया ट्रस्ट च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

48

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9डिसेंबर):-स्व.भोलारामजी कांकरिया यांच्या46 व्या स्मृतिदिना निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन भोलाराम कांकरिया ट्रस्ट च्या वतीने ठेवण्यात आल्याचे मंजूषा दर्डा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.असहाय गरजवंत दिव्यांगाना व तहानलेल्या, भुकेजलेल्या लोकांना आजपर्यंत मदत करणारी संस्था लोकांच्या आरोग्याची देखील काळजी घेत आसल्याचे या महा रक्तदान शिबिराच्या माध्यामातून लोकांच्या समोर येत आहे.सेवा,शिक्षण, संस्कार, जिवनाचा आधार ब्रीद असणाऱ्या संस्थेने लोकांना जे अमूल्य दान आहे ते रक्तदान *दिनांक 11 डिसेंबर 2022 रविवार रोजी सकाळी10 ते 3 या वेळेत द्वारका फंक्शन हॉल* येथे ठेवण्यात आले आहे.

शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तु देन्यात येनार आहे तसेच फोटो शुट साठी सेल्फ़ी कॉर्नर ची व्यवस्था पन केलेली आहे.

रक्तपेढी व रक्तविघटन केंद्र शासकीय जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या सौजण्याने व सवंगडी कट्टा सामाजिक समुह, राजस्थानी सेवासंघ,लॉयन्स क्लब गोल्ड सिटी,हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान,स्वराज्य संकल्प फाउंडेशन,गोकुळ ग्रुप यांच्या सहकाऱ्याने या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आसुन रक्तदान शिबिरास सहभागी होण्यासाठी रक्तदात्यांनी सिद्धार्थ दर्डा,आनंद धोका, संतोष तापडिया,अमर करंडे रमेश औसेकर,मनोज नाव्हेकर,नंदकुमार सोमाणी,रामेश्वर भोसले, गोविंद रोडे,शामसुंदर निरस, दिपक बचाटे,अतुल तुपकर,श्रीधर मुरकुटे यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन भोलाराम कांकरिया ट्रस्ट च्या सचिव मंजुषा दर्डा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.