महमित्र दत्ता वायचळे यांना सत्यशोधक समाजसेवक पुरस्कार

30

✒️साक्री(पुरोगामी संदेश नेटवर्क)

साक्री(दि-12जुुुलै):-पिंपळनेर ता. साक्री येथील आप्पासाहेब रूग्णसेवकजगताप गुरूजी प्रतिष्ठान तर्फे समाजासाठी विशेष योगदान देणा-या सिन्नरचे महामित्र सेवानिवृत्त  नायब तहसिलदार दत्ता वायचळे यांना 2020 चा “सत्यशोधक समाज सेवक “पुरस्कार ” तहसिलदार विनायक थविल यांच्या हस्ते देण्यात आला . यात सन्मान पत्र,स्म्रुती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्रराव मराठे व अॅड.ज्ञानेश्वर एखंडे ,वाणी समाज अध्यक्ष जयवंत बागड, रीखबचंद जैन, व्यासपीठावर उपस्थित होते.
    अध्यक्षस्थानी अपर तहसिलदार विनायक थविल हे होते.तर प्रमुख मान्यवर म्हणून अ. नि. स. चे शहर अध्यक्ष सुरेद्र मराठे,प्राचार्य ए.बी.मराठे,मुरलीधर मंदिर संस्थांनाचे अध्यक्ष सुदाम पगारे,जैन समाजाचे रीखबचंद जैन,तैलिक समाजाचे पांडुरंग सूर्यवंशी, सौ.विमल जगताप, डाॅ.राजेन्द्र पगारे,विजय पगारे ,वाणी समाज अध्यक्ष जयवंत बागड,पत्रकार बंधू, अ.भा.जैन समाज अध्यक्ष रिखबशेठ जैन,कृषि सहाय्यक प्रशांत गांगुर्डे,हभप.भालचंद्र दुसाने, आर. आर.गवळे,रेडीओ पांझराचे संचालक राहुल ठाकरे व्ही. एन. जिरे, रामचंद पाटील, प्राचार्य एस.टी.सोनवणे रामकृष्ण एखंडे,दिलीप बधान, दीपक खरोटे,नितीन कोतकर बाबा पेंढारकर,तुकाराम एखंडे ,पुंडलीक एखंडे, प्रदीप कोठावदे, श्याम कोठावदे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीलीप बधान, ग्रामपंचायत सदस्य ललित चौरे,महेश पाटील,डाॅ. गोसावी, डाॅ.चंद्रकांत खैरनार,डाॅ. उबाळे,माजी सभापती संजय ठाकरे,माजी उपसरनंच योगेश नेरकर, जे.टी. नगरकर,प्रा,डी टी. पाटील, प्रा .आहिराव ,माजी उपसरपंच शिलनाथ एखंडे, प्रमोद भावसार, कैलास सुर्यवंशी, रविंद्र खैरनार,सुभाष जगताप ,दिनेश जैन, सुतार लोहार समाज अध्यक्ष अरूण निकम, सेवानिवृत्त दादाजी खैरनार खैरनार गुरूजी, आदी उपस्थित होते.
यावेळी पुरस्कारार्थी दत्ता वायचळे, यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,पुरस्कार हे काम करणा-या माणसाला प्रेरणा देतात.समाजमनाची जबाबदारीचे भान करून देत राष्ट्र गौरव वृद्धीगत करतात.म्हणून सामाजिक जाणिवेतून काम करणा-या आदर्श व्यक्तिच्या नावाने मिळालेला पुरस्कार नव्याने उभारी देत असल्याचे गौरवोद्गगार समाजसेवक पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थीनी सांगितले.तर जगताप कुटुंब हे महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचारांनी ध्येयवेडे होऊन परिवर्तन वादी उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचे काम करीत असून त्यांनी आईला आग्नीडाग सुनेने दिला, वडीलांच्या अस्थि नदीत न टाकता घरासमोरच व शेतात खड्डा करुन त्यात झाड लावून वेगळा उपक्रम करून जलप्रदूषण टाळण्याचा संदेश दिला तर राजेन्द्र गवळी यानी ही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुभाष जगताप यांनी केले. 
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हा सोहळा अतिशय दिमाखदार झाला.अगदी मोजक्याच व्यक्तिच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न झाला. सूत्रसंचालन प्रा शिवप्रसाद शेवाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष जगताप, हरीश जगताप, सौ. विमल जगताप,श्रीकांत मराठे,सुनिल जैन, विशाल गांगुर्डे, दिलीप बोळे,भरत बागुल,चंदू घरटे, भिलाजी जिरे, दीपक घरटे, राजेन्द्र गवळी , हिम्मत जगताप,दीलीप बोले, दादा महाजन, राजू जगताप, प्रमोद भदाणे, ,भावेश जैन बाळक्रुष्ण सैंदाणे , ,हर्षल गोगड , शाम कोठावदे, अभिजित राशिनकर आबा जगताप, आदींनी परिश्रम घेतले.आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी मानले.