मा.प्रतिभाताई, वाढदिनी आभाळभर हार्दिक शुभेच्छा!

36

[मा.प्रतिभाताई पाटील वाढदिवस विशेष]

मा.प्रतिभाताई देवीसिंह पाटील या भारतीय प्रजासत्ताकाच्या बाराव्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर दि.२५ जुलै २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. श्री. एन. के. कुमार जी. यांच्या या लेखातून त्यांच्या वाढदिवशी ही महत्त्वाची माहिती… संपादक.

मा.प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे राजकारणात सक्रिय सहभागी झाल्या. अशा त्या ठराविक राजकिय व्यक्तींपैकी आहेत. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ इतर राष्ट्रपतींच्या तुलनेने निकृष्ट दर्जाचा आणि स्वप्रेमासाठी कार्यरत, असा कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या समाजकार्यात प्रारंभिक काळात त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली होती. ही त्यांची खुप जमेची बाजू आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुटुंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. प्रतिभाताई पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील- भारत जागवा, हिंदीमधील- भारत जगाओ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, जब मैं राष्ट्रपति थीं- २ खंड आणि स्त्री उत्कर्ष की ओर या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी, मराठी व इंग्रजीतील भाषणे तथा अन्य व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते, त्यात त्यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली. यावर टिका झाल्यानंतर मात्र त्यांनी ६००० वर्ग फुटावर बंगला बांधला आहे.

मा.प्रतिभाताईंच्या राष्ट्रपती कारकिर्दीत विविध कारणांसाठी त्यांची आलोचाना झाली. काहींचा उल्लेख असा- १. प्रतिभा पाटील यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक गुन्हेगारांचे निर्घृण गुन्हे माफ केले. त्या आजवरच्या सगळ्यांत दयाळू राष्ट्रपती ठरल्या. त्यांनी ३५ निर्घृण गुन्हेगारांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. आधीच्या ३० वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या दयेच्या अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्के होते. त्यांनी महिलांसाठी अनेक उत्तम कामे केली. त्यांच्याच काळात अन्टी रँगिग हा कायदा अंमलात आला व देशातील अत्याचार कमी झाले. २. एका आरटीआयमधूून भारत सरकारद्वारे उत्तर देेण्यात आले होते. त्यात राष्ट्रपती पदावरुन निवृत्त होत असतांना राष्ट्रपती‌ असतांनाच्या पाच वर्षांच्या काळात त्यांना मिळालेले जवळजवळ सर्व गिफ्ट त्या स्वतःबरोबर घेऊन गेल्या होत्या. हे गिफ्ट त्यांना विदेशी दौऱ्यावर असताना विविध राष्ट्रांच्या प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि राष्ट्र प्रतीनीधींकडून मिळालेल्या होत्या. सामान्य स्थितीत राष्ट्रपती जेव्हा त्यांचे पद सोडून जातात, तेव्हा त्यांना राष्ट्रपती असतांना मिळालेले गिफ्ट राष्ट्रपती भवनातच राहू देतात. ३. परिवारासोबत जनतेच्या कष्टाच्या पैश्यावर विदेश यात्रा केल्या. त्या केव्हा केव्हा नातवंडांना तर कधी परिवारातील बाकीच्या लोकांना विदेश दौऱ्यावर घेऊन जात व सर्व प्रवास खर्च, राहण्याचा खर्च टॅक्स पेयार्स गरीब जनतेच्या खिशातून खर्च होत राहिला. त्यांनी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात २२ देशांच्या यात्रा केल्या, चार खंडात प्रवास, १२ विदेशी दौरे केले. भारतीय विदेश मंत्रालयाने त्यांच्या राहण्यात, विदेशामध्ये फिरण्यात तब्बल २०५ करोड रुपये खर्च केले. विदेश तसेच भारतातील त्यांनी चार्टर्ड- खाजगी विमान वापरले. त्यात जनतेेेचे ३६ करोड व्यर्थ घालवले. त्यांच्या तुुुुलनेत डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांनी १२ विदेशी यात्रा केल्या होत्या.

मा.प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांचा जन्म दि.१९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी एम.जे.कॉलेज, जळगाव येथून एमएची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून एलएलबीची परीक्षा देऊन त्या वकील झाल्या. सन १९६५मध्ये डॉ.देवीसिंग शेखावत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. एक मुलगा आणि एक मुलगी अशी त्यांना अपत्ये आहेत. त्या एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स.१९६२ ते १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खात्याच्या मंत्री होत्या.
मा.प्रतिभाताई पाटील यांची राजकीय कारकीर्द अशी- १. सन १९६७पासून ते १९८५पर्यंत त्या मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार राहून त्यांनी मुक्ताईनगर तेव्हाचे एदलाबाद येथील प्रतिनिधित्व महाराष्ट्र विधानसभेत केले. नंतर त्या अमरावतीतून भारतीय लोकसभेत खासदार राहिल्या. त्या राजस्थानच्या गव्हर्नरसुद्धा राहिल्या. इ.स.२००७मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या. २. त्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत, की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही. तसेच त्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत, कि ज्यांनी आपल्या राष्ट्रपती कार्यकाळात एक सुखोईसारखे लढाऊ विमान चालवले, तेही वयाच्या ७४व्या वर्षी! जगातील एकमेव महिला राष्ट्रपती ज्यांनी आपल्या देशाची संस्कृती जपत कुठल्याही प्रकारचा राजशिष्टाचार तोडला नाही, एवढ्या त्या आपल्या भारत देशाच्या संस्कृतीचा आदर करतात.

३. इ.स.१९६२साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. दि.७ जुलै १९६५ला त्यांनी लग्न करून अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला व पहिल्यांदाच मंत्री झाल्या. त्यानंतर पुढे सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्यांच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारुबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड वगैरे वगैरे. सन १९७९-८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इ.स.१९८५साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून सन १९९१साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. सन १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. सन १९७८ला मुक्ताईनगर तेव्हाचे एदलाबाद येथील मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच सन १९८५मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बॅंकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि जोतिबा फुले महामंडळ आदींची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे आज आपणास वाढदिवसानिमित्त निरामय जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री. एन. के. कुमार जी. गुरूजी(भारतीय थोर पुरुषांच्या चरित्रांचे गाढे अभ्यासक)मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.फक्त व्हा. नं. ९४२३७१४८८३.