राजगृहावरील हल्ला प्रकरणा चा निषेध-समता सैनिक दल ब्रम्हपुरी

16

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी, तालुका प्रतिनिधी)

मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि.१३ जुलै):- परमपुज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानावर एका माथेफिरुने केलेल्या भ्याड हल्लाचा समता सैनिक दल , ब्रम्हपुरीचा वतीने जाहीर निषेध करण्यात आले .राजगृह म्हणजे आमचे प्रेरणास्थान आहे. आदर्श व्यक्ती घडविण्याचे ते एक केंद्र आहे . राजगृहला भेट देताना एक वेगळा आंनद निर्माण होतो .बाबासाहेब आंबेडकरावर आमची आदराची भावना व नितांत प्रेम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञानाचे ते उगमस्थान आहे.

अशा या ठिकाणावर एका माथेफिरुने केलेला भ्याड हल्ला म्हणजे आदर्श विचाराच्या मुळावरच घाव घालणे आहे. व हा प्रकार अत्यंत निंदनिय आहे.
सदर घटनेची योग्य ती सी.बी.आय चौकशी करून गुन्हेगारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. सदर घटनेचा समता सैनिक दल , ब्रम्हपुरीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले.निषेध चे निवेदन देते वेळेस इंजी. डेव्हिड शेन्डे,चंद्रभानजी राऊत, डॉ. युवराज मेश्राम, विलास मेश्राम , इंजी. संतोष वासनीक, प्रफुल ढोक तसेच समता सैनिक दल ब्रम्हपुरी हे उपस्थित होते.