आपण डिजिटल मीडियाचे मालक/संचालक आहात का?.. मग सहभागी व्हा.. न्यूज पोर्टल संपादकासाठी डिजिटल मीडिया वर्कशॉप मध्ये….!

  87

  ✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

  ?आपल्या स्वतःच्या मालकीचे न्यूजपोर्टल आहे?

  ?मग जाणून घ्या डिजिटल मीडियाचे कायदे

  ?केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडे नोंदणी कशी करावी?

  ?न्यूज पोर्टलला कायदेशीर आणि तांत्रिकदृष्टया परिपक्व करण्यासाठी अवश्य सहभागी व्हा…!

  डिजिटल मीडिया आणि कायदेशीर तरतुदी
  (खास डिजिटल मीडिया मालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा)

  प्रवेश मर्यादित असल्याने आजच नोंदणी करा

  ?कार्यशाळेची रूपरेषा
  दिनांक :शनिवार, 7 जानेवारी 2023
  ?वेळ :सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत
  ?स्थळ :वनामती, भोळे पेट्रोल पंप जवळ, नागपूर
  ?सहभागिता शुल्क :500/- (भोजन व्यवस्थेसह)
  ?प्रवेश क्षमता :केवळ 40

  अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9527002188
  कार्यशाळेबद्दल थोडेसे पत्रकारिता हे क्षेत्र चांगलेच विस्तारले आहे.

  प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यासह आता वेब पोर्टल, यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून पत्रकारितेतील नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. लिखाणाची आवड असलेल्या आणि पत्रकारितेत करिअर बनवू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी ‘वजीर ऑनलाईन’ने पत्रकारितेतील विविध पैलूंची सूक्ष्म माहिती मिळविण्यासाठी पत्रकारितेशी संबंधित विविध कार्यशाळांचे नियोजन केले आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियासोबतच वेब पोर्टल, यू-ट्यूब चॅनलसाठी पत्रकारिता करताना आवश्यक असलेल्या बाबींचे प्रशिक्षण वर्षभर विविध ठिकाणी आयोजित पत्रकारिता कार्यशाळेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील. कार्यशाळेत महाराष्ट्रातील पत्रकारितेत नावाजलेल्या संपादक, पत्रकारांकडून प्रशिक्षण देण्यात येईल. इतकेच नव्हे तर प्रशिक्षणानंतर नवोदितांना लिखाणासाठी ‘वजीर ऑनलाईन’ स्वतंत्र व्यासपीठही उपलब्ध करून देत आहे. नवोदितांसाठी ‘वजीर’ ऑनलाईनने उपलब्ध करून दिलेली ही संधी आहे. ह्या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि उद्याचे नामवंत पत्रकार व्हा…!

  पत्रकारिता प्रशिक्षणासोबतच ‘वजीर ऑनलाईन’ नेतृत्व विकास, व्यवसाय वृद्धी, व्यक्तिमत्त्व विकास, महिला नेतृत्व, अभिनय क्षेत्र आदी विषयांवर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देते. ताणतणाव मुक्ती कार्यशाळा, अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण कार्यशाळा आदींच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना माहिती देते. या सर्व प्रशिक्षण आणि कार्यशाळांच्या तारखा वेळोवेळी आमच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. यामध्ये आपण ‘ऑनलाईन’ प्रवेश निश्चित करून कार्यशाळेत सहभागी होऊ शकता.

  ▪️ कार्यशाळेबद्दल महत्त्वाचे
  ?सदर प्रशिक्षण हे सर्वांसाठी खुले आहे.
  ?प्रशिक्षणाचे शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहे.
  ?प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला कार्यशाळेत आवश्यक कीट दिली जाईल.
  ?एक दिवसीय कार्यशाळेत दोन वेळचा चहा आणि दुपारच्या भोजनाची व्यवस्था राहील.
  ?निवासी प्रशिक्षण कार्यशाळेत निवास, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था करण्यात येईल.
  ?प्रशिक्षण घेतलेल्यांना लिखाणासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.
  ?प्रशिक्षण कार्यक्रमात ऐनवेळी बदल झाल्यास त्याची सूचना नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मोबाईलवरून देण्यात येईल.
  ?प्रशिक्षण कार्यशाळेचे सर्व अधिकार ‘वजीर ऑनलाईन’ने राखून ठेवलेले आहेत.