अवैध दारुसह सहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत-आष्टी पोलिसांची कारवाई

29

🔺दोघांना घेतले ताब्यात-मुख्य आरोपींचा पोलीस घेत आहेत शोध

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)

आष्टी(दि.30 डिसेंबर):-चंद्रपूर वरून दारूची अवैधरित्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी कडे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच आष्टी पोलिसांनी सापळा रचून अवैध दारुसह दोघांना ताब्यात घेऊन मुख्य पुरवठादार कोण याबाबत पोलिस शोध घेत आहेत. दिनांक २९ डिसेंबर रोजी रात्रौ पोलिसांना गोपनीय सूत्राद्वारे चंद्रपूर ते आष्टी येथून एक स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH 31- DC 6816 या गाडी मधून चोरट्या मार्गाने अवैध्य रीत्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन आष्टी पोस्टचे कर्मचारी खाजगी वाहनाने रवाना होऊन फॉरेस्ट नाका येथे गाडीस थांबवून सदर गाडी चेक केले असता.

त्यामध्ये ९० मि. लि. मापाचे देशी दारू संत्रा कंपनीचे दारू ( अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये) आढळून आले. गाडीतील दोन व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत एक पांढऱ्या रंगाची जुनी वापरती स्कॉर्पिओ गाडी (किंमत अंदाजे पाच लाख रुपये) ताब्यात घेण्यात आले आहे.

दारू व चारचाकी वाहन असा एकूण-६,६०,०००/- मुद्देमाल मिळुन आला.

गाडी मधील दोन इसम व पोलीस शोधत असलेला एक आरोपी असे एकूण ३ आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद महादेव दुर्योधन (वय 37 वर्षे), मुकुंद गंगाराम चालूरकर (वय 50 वर्षे) हे अटकेत आहेत. या कारवाईतील तिसरा आरोपी कोण?याबाबत अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहेत. तिसरा आरोपी चंद्रपूर येथील शैलेश वानखेडे असावा या दिशेने पोलिस तपस करीत आहेत.

या घटनेचा तपास आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ज्ञानेश्वर सराफ, नापोशी अविनाश कारशेट्टीवार, पोलिस शिपाई अतुल तोडासे, पुंडलिक चौधरी करीत आहेत..