राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांची निवड

145

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7जानेवारी):- सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड यांची “राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कारा ” साठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र देखील त्यांना प्राप्त झाला आहे. धर्मगुरू महान तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत, यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ‘राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार’ वितरणाचे कार्यक्रम तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे ११ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या देशातील २१ जनांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती तालुक्यातील पेदाआसापुर या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांची निवड करण्यात आली असून राज्यातून समाजातील ते एकमेव आहे. ज्यांची निवड झाली आहे.याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.तत्पूर्वी सुदाम राठोड हे त्यांच्या क्षेत्रात अनेक सामाजिक कार्य करत असतात.त्यांच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिरे घेऊन हजारो लोकांना त्यांच्या माध्यमातून रक्त उपलब्ध करून दिले यांच्यासह दिनदुबळ्यासाठी स्वतःला वाहून घेत असतात.

त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे पंचक्रोशीतून बोलल्या जात आहे,तत्पूर्वी त्यांच्या निवडीने चंद्रपूर जिल्ह्यासह जिवती तालुक्यात ढवळून निघाला आहे.दरम्यान सदर पुरस्कार मिळणार असल्याचा विलक्षण आनंद असून अजून सामाजिक कार्याचा भार खांद्यावर पडणार आहे.त्यामुळे या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणार असल्याचे सुदाम राठोड यांनी सांगितले आहे.