जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण कार्यशाळा : ऊर्जा स्त्रोत

27

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सहचर्य हा स्थायीभाव असतो. त्यामुळे माणसाला माणसांत मिसळायला, मैत्री करायला आवडतं. म्हणून तर प्रेम नावाची गोष्ट आंतरप्रवाही होते. एकदा तथागतांना शिष्यांनी विचारले, जगातील कोणती जागा सर्वश्रेष्ठ आहे.ती सहज घेता येणार नाही. तेव्हा तथागतांनी सुंदर समर्पक उत्तर दिले. विश्वाच्या पाठीवर कुठेही, ती पैशाच्या, साम्राज्याच्या बळावर घेता येईल, पण एखाद्याच्या मनात तुम्ही कधी घर करणार…. जगातील एका माणसाच्या हृदयात स्थान प्राप्त करणे, महा कठीण गोष्ट आहे. ती सर्वात महाग जागा आहे.

दोन तपस्वींच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या मातीच्या मुलायम स्पर्शाने आमचे रोमारोमांत उत्साह पेरून गेला. सेवा, समर्पनाची भावना गाडगेबाबांनी उभ्या महाराष्ट्राला शिकवली. स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा याचे लोकशिक्षण त्यांनी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या दूरदृष्टीचे दर्शन होते. शिक्षणाची गरज ओळखून या क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली आहे. ती कदापी समाज विसरू शकणार नाही. प्रबोधिनी अमरावती कायम स्मरणात राहील.

अगदी तसेच आपण आपल्या रसाळ वाणीतून, सहचरातून, वागण्यातून आपण माणसं आहोत, हे सिद्ध केलय. आपण निपुण निश्चित आहोत. व्यवस्थेने मनावर निर्माण केलेले मळभ,आपणच धुतले पाहिजेत, हा विश्वास आपण दोघांनी सुलभक या नात्याने सुलभ रीतीने निर्माण केलाय, यात शंका ती कुठली?चोवीस तासातील साधारणपणे चौदा पंधरा तास कम करताना, उर्जा तसूभरही ढळली नाही. नव्हे आपण ती ढळूच दिली नाही. अध्ययनाची समानानुभूती सम पातळीवर गेली की शिकण्याची इच्छा होते. सिक्स सी कौशल्य प्रत्येक मुलाला प्राप्त झाली पाहिजेत. तरच एकेविसाव्या शतकाला आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे. हे उद्दिष्ट साध्य करता येईल.

मित्रांनो, आपल्याला मिळालेली निपुणतेची शिदोरी, आता मुलांच्या पुढ्यात सोडायची आहे. एवढा विश्वास आपल्यात पेरला आहे. भरभरून दिलेला प्रतिसाद अद्भुत होता. कार्यशाळेत सहभागी सदस्यांच्या स्तर, वय,अनुभव आणि वैचारिक दृष्टिकोन वेगवेगळे असले, तरी आपण कधीच गोंधळून गेले नाहीत, ही वस्तुस्थिती होती. जे घेयाचे ते मनापासून घेतलात, जे देयाचे ते दातृत्वाच्या भावनेने भरपूर दिलात. अरूण सर आपलं उदाहरण मनोमन पटलं आहे. “भिक्षेचे पात्र बघून, दाते दान देत असतात.” हे सत्य आहे. आपणही आमच्या गटातील मंडळींच जिज्ञासू वृत्तीचं भिक्षापात्र निश्चितच, आपण ओळखलं आहात. म्हणून, खूप छान समजून घेतलात आपण.पेटवलेली मशाल कायम शांत, संयमाने आणि सातत्याने तेवत ठेवायची आहे. तिचा टेंभा कधीच होऊ द्यायचा नाही. ती मशाल पथदर्शी, मार्गदर्शक म्हणून आपल्या सोबतीला असेल.

मैत्रीचा पुढे केलेला हात, आपण आता अखडता घेयाचा नाही. नव्या संकल्पना, केलेले प्रयोग, दिलेले आव्हान, या सर्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी “सेल्फी वुईथ सक्सेस ” आपण ज्ञानाची देवाणघेवाण अविरतपणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून, संत तुकोबारायांच्या,शब्द आमुच्या जिवाचे जीवन

✒️चंद्रकांत गायकवाड(विद्यानिकेतन,पब्लिक स्कूल,कमळेवाडी,या. मुखेड जि. नांदेड