५० विमान प्रवाशांच्या हक्कासाठी ‘वॉचडॉग फाउंडेशन’चा पुढाकार

28

✒️मुंबई (पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(14जुलै)’-लॉकडाउनमुळे रद्द होत असलेल्या ५० विमान तिकिटांची रक्कम GoAir ने ‘क्रेडीट शेल’च्या नावाखाली अडवून ठेवली. या संदर्भात आवाज उठविण्यासाठी मुंबईतील ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने ५० प्रवाशांच्या हक्कासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
ग्राहकांच्या संमतीशिवाय पैशांचा गैरवापर करीत असून गो-एअरच्या आर्थिक लुबाडणुकीची तक्रार संबंधित ठिकाणी केली आहे. विविध वर्तमानपत्रांमधून मिळणाऱ्या समाजोपयोगी बातम्या, आर्थिक लुबडणूकची दखल ही संस्था घेत असते. ‘वॉचडॉग फाउंडेशन’च्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी नागपूरचे हरिहर पांडे यांचेशी संपर्क साधत अधिक माहिती जाणून घेतली.
रद्द झालेल्या विमान तिकिटाची रक्कम १३४७५०/- रूपये प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध ‘क्रेडिट सेल’मध्ये टाकण्यात आली आहे, ही कृती अवैध आहे. अशाप्रकारे रक्कम आपल्याकडे जमा करून ठेवणे हे प्रवाशांच्या अधिकारांचे हनन करणारे असून हा निर्णय मनमानी करणारा आहे. अशी तक्रार ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, DGCA, महासंचालनालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे केलेली आहे.
प्रवाशांना त्वरीत परतावा मिळावा, असा आदेश नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, DGCA, सरकारने काढावा अशीही मागणी Watchdog Foundation तर्फे Trustees Nicholas Almeida/Adv.Godfrey W. Pimenta, Advisors Adv. Vivian D’Souza/Rita D’Sa आणि Adv. Tulip Brian Miranda (President, Bombay East Indian Association) यांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, नागपूरचे हरिहर पांडे यांनी लॉकडाऊनपूर्वी GoAir च्या ३० जुलै २०२० साठी नागपूर ते मुंबई प्रवासाच्या ५० ग्रुप तिकीट १७ मार्च रोजी बुक केलेल्या आहेत. त्यासाठी तेव्हाच २६९५ रूपये प्रति सीट प्रमाणे ५० तिकिटांचे १३४७५०/- रूपये GoAir कडे नागपूर विमानतळावर जमा केले. ९९०००/- नगदी तर ३५७५०/- रूपये क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट केलेले आहे. परंतु आता गो-एअरने विमान रद्द झाल्याचे व तुमचे पैसे Credit Shell मधे ठेवून घेतल्याचे कळविले आहे.
प्रवाशांनी स्वतःहून तिकीट रद्द केले तर गो-एअर कॅन्सलेशनच्या नियमानुसार पैसे ठेऊन रद्द करते, विमान जर रद्द झाले तर स्वतःहून पैसे परत दिले पाहीजे. ‘क्रेडीट शेल’च्या नावावर भविष्यात गरज नसताना ग्राहकांवर विमानप्रवास थोपविणे, रद्द होत असलेल्या तिकीटांचे पैसे प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध वर्षभर बिनव्याजी वापरणे, पुन्हा प्रवासाची सक्ती करणे, अशाप्रकारे ५० प्रवाशांची आर्थिक कोंडी करून त्यांची लूबाडणुक करणे, हे उचित नसल्याचे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
समाजातील महत्वाच्या प्रश्नांवर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘वॉचडॉग फाउंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे. मुंबईतील मोठी अशासकीय संस्था असून नागरी व इतर समस्यांवर सातत्याने आवाज उठवणारी व वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी संस्था म्हणून संघटनेचा लैकिक आहे. संस्थेच्या सहकार्याबद्दल नागपूरचे हरिहर पांडे यांनी ‘वॉचडॉग फाउंडेशन’चे आभार मानले आहे.