एसआरपीएफच्या २९ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

18

🔺Gadchiroli CoronaUpdate

🔸दि.१४ जुलै, स.११.००वा.

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.14जुलै):-पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व धुळे वरून आलेल्या 150 राज्य राखीव पोलीस दलातील जवानांपैकी 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. ही दीडशे जवानांची तुकडी गेल्याच आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती यातील 29 पॉझिटिव तर इतर सर्व जवानांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आत्तापर्यंत जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाचे 72, राज्य राखीव दलाचे 29, सीमा सुरक्षा दलाचे 2 असे मिळून 103 जवान कोरोना बाधित आढळून आले आहेत.