व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी नियमित बाजारपेठ सुरु होणे गरजेचे -आ. सुलभाताई खोडके

6

🔹आ. सुलभाताई खोडके यांची जिल्हा आपत्ती प्राधिकरणीशी चर्चा …
🔸ऑड अँड इव्हन पद्धतीला व्यापाऱ्यांची नाराजी

✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)

      मो:-9545619905

अमरावती(दि.१४जुलै): अमरावतीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या कालावधीत दर आठवड्यातील शनिवार , रविवार या दोन दिवशी बाजारपेठ बंद राहतील .असे सूतोवाच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले होते . दरम्यान कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याकरिता तसेच चाचण्यांची क्षमता वाढविण्यासह रुग्णसंपर्क शोध मोहीम व्यापकपणे वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे वतीने योग्य नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून अविरतपणे कार्य सुरु ठेवण्यात आले . संचारबंदीच्या काळात काही खासगी रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्स व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता मुख्य बाजारपेठेसह शहराच्या इतरही भागातील प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद होती . दरम्यान विविध भागातील नागरिक प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतांना दिसले .
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाप्रशासनाकडून सम -विषम ( ऑड अँड इव्हन )पद्धतीने शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्यास जी परवानगी देण्यात आली ती आता बंद करून आठवड्यातील पाच दिवस दुकाने सुरु ठेवण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी , या मागणीला घेऊन व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने आ. सौ सुलभाताई खोडके यांची भेट घेण्यात आली . सदर बाब ही व्यापाऱ्यांसह तेथील कामगार व ग्राहकांच्या हिताची असल्याने व्यावसायिकांची मागणी तथा नागरिकांसह ग्राहकांचे सुविधेकरिता पी १ पी २ फार्मुला ऐवजी सर्व दिवस व्यापारी प्रतिष्ठाने सुरु करण्याला परवानगी देण्यात यावी . या बाबीला घेऊन आ. सौ सुलभाताई खोडके यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल , पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर , महानगर पालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी चर्चा केली . यासोबतच गेल्या ५ जून पासून अमरावती शहरात पी १ पी २ प्रणालीने व्यापार सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे . मात्र या पद्धतीने एका महिन्यात केवळ १० दिवसचं एक दुकान सुरु राहू शकते . त्यामुळे व्यावसायिकांना दुकानाचा खर्च सुद्धा परवडत नाही . यापूर्वी कोरोनाचा लॉकडाउनमुळे व्यापार जगत बंद असल्याने व्यापारी वर्गाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे . आदीसहित व्यापाऱ्यांच्या अन्य समस्या अवगत करण्यासह आमदार महोदयांच्या वतीने यावेळी जिल्हाधिकारी , पोलीस आयुक्त तसेच मनपा आयुक्त यांचे लक्ष वेधण्यात आले . केंद्र व राज्य शासनाचे वतीने अर्थचक्राला गती देण्याकरिता मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक -२ च्या काळात सद्या स्थितीत अमरावती शहरातील बाजारपेठांमध्ये पी १,पी २ , फार्म्युल्यासह व्यवसाय व प्रतिष्ठाने सुरु आहेत . परंतु या प्रणाली ला घेऊन नागरिकांमध्ये अनभिज्ञता व संभ्रम निर्माण झाल्याने आपल्या पसंतीचे दुकाने नेमके कधी सुरु आहे , हे निश्चित नसल्याने अनेक ग्राहक हे खरेदीविनाच निराशेने परतत होते . तसेच सम -विषम पद्धतीने दुकाने सुरु असल्याने नागरिकांची देखील वस्तू खरेदीसाठी एकक गर्दी होतांनाचे दृश्य बघायला मिळाले . यामुळे सोशल डिस्टंसिंगचे सुद्धा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले . त्यामळे हि प्रणाली व्यापारी व ग्राहकांकरिता गैरसोयीची ठरू पाहत होती .हि बाब आमदार सुलभाताई खोडके यांनी जिल्हा प्राधिकरणाच्या लक्षात आणून दिली . अमरावतीमध्ये १५ ते २० हजार दुकानांमध्ये जवळपास ४० हजार कामगार अनलॉक मुळे कामावर परतली आहे .त्यामुळे त्यांचे कुटुंबातील जवळपास दीड लाख सदस्यांच्या उदरनिर्वाहाची सोय झाली आहे . त्यामुळे आता जर व्यापार नियमित सुरु झाल्यास व्यापाऱ्यांसह कामगारांकरिता सुद्धा हि बाब निश्चितच उपयुक्त ठरणार आहे . त्यामळे सोशल डिस्टंसिंग , थर्मल स्र्किनींग , मास्क वापर , सॅनिटायझर चा वापर आदी उपाययोजना करून तसेच प्रशासनाच्या नियमावली नुसार हा व्यवसाय नियमितपाने सुरु करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात यावी , अशी मागणी आमदार महोदयांनी चर्चे दरम्यान केली असतांना जिल्हाधिकारी , पोलीस आयुक्त तसेच मनपा आयुक्त यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आ. सुलभाताई खोडके यांना आश्वासन दिले . अमरावतीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा , पोलीस विभाग , मनपा कर्मचारी , वैद्यकीय यंत्रणा , सर्व शासकीय यंत्रणा योध्यांप्रमाणे कार्यरत आहे नुकत्याच जनता कर्फ्यू ला अमरावतीकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आ. सौ सुलभाताई खोडके यांनी अमरावतीकर नागरिकांचे तसेच सर्व कोरोना योध्यांचे अभिनंदन करीत आभार मानले आहे . तसेच पुढेही अमरावतीकरांचे असेच अपेक्षित सहकार्य प्रशासनाला राहील ,असा विश्वास आ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला आहे .