दिग्रस एचपी क्रिकेट क्लब ने जिंकले प्रथम बक्षीस

84

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 15 जानेवारी):-शहराला लगत असलेले बिटरगाव आबाजी रोडवरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान (खराब मैदान) येथे मागील एक जानेवारीपासून एकता क्रिकेट क्लब उमखेडच्या वतीने सुरू करण्यात आलेले टेनिस क्रिकेट ची खुले सामने आजची संपन्न झाली आहे.

आज या सामन्यांचा शेवटचा दिवस होता या सामन्यांमध्ये दिग्रस HP विरुद्ध एकता क्रिकेट क्लब मंडळ उमरखेड चा अंतिम सामन्या मध्ये शेवटच्या ओवर मध्ये 6 बॉल मध्ये 6 रन्स एकता क्रिकेट क्लब ला पाहिजे होते.पण या अटीटटीचा सामन्यामध्ये 3 रन ने हा मॅच हारला आहे.तर दिग्रस HP ने हा मॅच 3 रन ने जिंकुन प्रथम 31 हजार रुपये जिंकले आहे.

या टेनिस बॉल क्रिकेट खुले सामन्याचे बक्षीस गोपालभाऊ अग्रवाल व सोनूभाऊ खतीब यांनी प्रथम बक्षीस 31 हजार रुपये दिले होते. तसेच दुतीय बक्षीस 21 हजार रुपये बाबू हिना व अहमदभाई राज यांनी दिले होते.तर तृतीय बक्षीस 11हजार रुपये जुबेर कुरेशी यांनी दिले होते.

दुतीय बक्षीस 21 हजार रुपये एकता क्रिकेट क्लब उमरखेड ने जिंकले आहे.तर तृतीय बक्षीस 11 हजार रुपये न्यू स्टार 11 उमरखेड ने जिंकले आहे.

यावेळी या क्रिकेट सामन्याचे आयोजन प्रफुल दिवेकर, मोहम्मद इम्रान, नितीन आठवले, तौफिक शम्स, सिध्दार्थ दिवेकर, अन्सार अहमद हाफिज साहब, शेख तौकिर यांनी केले होते.यावेळी हजारोच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.