दैनिक अर्थ वृत्तपत्राच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्ताने पत्रकारांचा गौरव व सन्मान

37

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

 नांदेड(दि.16जानेवारी):- शहरामध्ये मकर संक्रांत दिनाचे औचित्य साधून दैनिक अर्थ या वृत्तपत्राचा पहिला वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला या वर्धापनदिनी दैनिक अर्थ वृत्तपत्राचे मुख्य संपादक माननीय अनुप आगाशे साहेब यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले होते या कार्यक्रमात विविध वृत्तपत्रात उत्कृष्ट पद्धतीने काम करत असलेल्या पत्रकारांचा गौरव व सन्मान भारतीय संविधानाची संविधान उद्देशिका व लेखणी देऊन करण्यात आला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा माजी खासदार व आमदार दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे साहेब यांची आवर्जून आठवण काढून त्यांच्या आदर्श विचारांचे व सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्याचे स्मरण करून आला.

दि. 15/01/23 रोजी दैनिक अर्थ च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दैनिक अर्थ चे मुख्य संपादक अँड. अनुप आगाशे यांनी कै. नरहर कुरंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे दैनिक अर्थ या वृत्तपत्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दैनिक अर्थ या वृत्तपत्रा मार्फत पत्रकार बांधवांचे भारताच्या संविधानाच्या उद्देशिका व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सन्मानीय न्यायाधीश दलजीत कौर मॅडम ,विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायाधीश नांदेड यांच्या हस्ते दैनिक अर्थ च्या वृत्तपत्राचे प्रथम वर्धापन कार्यक्रम सुरू केला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री संतोष पांडागळे कार्यकारी संपादक दैनिक सत्यप्रभा , मा. श्री. विजय जोशी दैनिक सामना जिल्हा प्रतिनिधी , मा. श्री प्रकाश कांबळे मराठी पत्रकार परिषद मुंबई, अँड. दिलीप ठाकूर सामाजिक कार्यकर्ते, मा. प्रवीण जेठेवाड सामाजिक कार्यकर्ते, यांच्या उपस्थितीत दैनिक अर्थ च्या प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

तसेच दैनिक अर्थ च्या माध्यमातून पत्रकार बांधव गणेश कचकलवार, दैनिक अर्थ सहसंपादक , प्रा. यांनभूरे जयवंत सोपानराव नांदेड प्रतिनिधी दैनिक चालू वार्ता , श्री समर्थ लोखंडे ऊत्तर नांदेड प्रतिनिधी दैनिक चालू वार्ता , शुभम पांचाळ जिल्हा प्रतिनिधी विष्णुपुरी एक्सप्रेस, शेख आरिफ महाराष्ट्र 24 मराठी न्यूज मुख्य संपादक तथा दैनिक रोखठोक उमरी तालुका प्रतिनिधी, विजय चोडेकर सामाजिक कार्यकर्ते दिव्याग संगठण , रामचंद्र गायकवाड व्यसन मुक्ती एक संकल्प मासिक संपादक , सतीश वाघमारे जागृत महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह मिलिंद वाघमारे मुख्य संपादक माईंड लाईट न्युज ,शेख शफी इस्माईल डेली भास्कर , दिनेश येरेकर द टेलिऑक्स जिल्हा प्रतिनिधी , आनंदा सोनटक्के न्युज , गोकुळ यादव सामाजिक कार्यकर्ते, शिवकुमार काळे , ABP लाईव्ह , अँड सुमंत लाठकर, नांदेड , जी. एस. पांचाळ मुगतकर, दैनिक महानायक , या. या. खान यांना संविधानाची उद्देशिका व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम दरम्यान उद्घाटक मा. न्यायाधीश दलजीत कौर मॅडम जिल्हा न्यायाधीश नांदेड यांनी कायदे विषयक माहिती पत्रकारांना सांगितली .

याप्रसंगी कार्यक्रमास उद्घाटक म्हणून सन्माननीय दलजीत कौर जेज मॅडम सचिव – विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा न्यायाधीश नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच माननीय श्री विनोद रापतवार ( जिल्हा माहिती अधिकारी ) माननीय श्री अनिकेत ( काका ) कुलकर्णी ( ज्येष्ठ पत्रकार ) माननीय श्री केशव घोणसे पाटील ( दैनिक गोदातीर समाचार – मुख्य संपादक ) माननीय श्री संतोष पांडागळे ( कार्यकारी संपादक दैनिक सत्यप्रभा ) माननीय श्री विजय जोशी ( दैनिक सामना जिल्हा प्रतिनिधी ) माननीय श्री प्रकाश कांबळे ( माजी विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद मुंबई ) यांच्यासह दैनिक अर्थ वृत्तपत्राचे मुख्य संपादक ऍड.अनुप आगाशे व प्रकाशक ऍड. शितल आगाशे ( क्षीरसागर ) यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.

या कार्यक्रमात विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांचा गौरव व मान सन्मान करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांनी भारतीय संविधान आणि संविधान उद्देशिकेचे महत्त्व आपापल्या भाषणातून पटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच वर्तमानपत्रेही समाज जीवनाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तो आधारस्तंभ कायम मजबूत समाजात टिकून ठेवण्यासाठी पत्रकाराने अतिशय निर्भिड व प्रामाणिकपणाने पत्रकारिता केली पाहिजे असे विचार मान्यवराकडून ऐकव्यास मिळाले आभारा अंती अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

तसेच दैनिक अर्थ चे मुख्य संपादक अँड. अनुप आगाशे यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला व दैनिक अर्थ चे पत्रकार अनिकेत राठोड, शैलेंद्र शर्मा , गौतम सूर्यवंशी , गजानन गिरगावकर , राजू गायकवाड, रवी हटकर , सचिन शिंदे , उत्तम लांडगे, विजय गायकवाड, संतोष वाघमारे, तुकाराम जवादवार, चांद्रमुनी सावंत , विजयकुमार मोरलवार, आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.