नेहरु विद्यालय चिमुर येथे स्नेहसम्मेलनाचे आयोजन

28

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर  प्रतिनिधी)

चिमुर(दि.20जानेवारी):-एज्युकेशन सोसायटी चिमुर द्वारा नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, नेहरु प्राथमिक शाळा चिमुर येथे दिनांक २१ ते २७ जानेवारी या कालावधीत क्रिडा स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम, बौद्धीक कार्यक्रमानिशी स्नेहसम्मेलन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

दिनांक २९ जानेवारीला शालेय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य वडस्कर, उपमुख्याध्यापक कढव, मुख्याध्यापिका ढाकुणकर यांच्या हस्ते होईल. दिनांक २४ ते २५ जानेवारी दरम्यान होणान्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटनाकरीता उद्घाटक म्हणून चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, संचालक दिलीप चौधरी, चिमूर एज्युकेशन सोसायटी चिमुरचे अध्यक्ष मधुकर गोडे, सचिव मनोहर कोसुरकर, उपाध्यक्ष तेजराम तिवाडे, सहसचिव दत्तु शेंडे, चिंतामन रामटेके, वसुधा विचमलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिनांक २६ जानेवारीला होणा-या ध्वजारोहणाकरीता चिमुर एज्युकेशन सोसायटी चिमुरचे अध्यक्ष मधुकर गोडे, सचिव मनोहर कोसुरकर, सहसचिव दत्तु शेंडे, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, माजी अध्यक्ष गुमदेवबापू सोनवाने, सदस्य अर्जुन शेंडे, भाऊराव शेंडे, जनार्धनवापू चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहतील.

दिनांक २७ जानेवारीला स्नेहसम्मेलना दरम्यान झालेल्या विविध स्पर्धेचे बक्ष • वितरणाकरीता प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक मनोज गभणे, अध्यक्ष मधुकर गोडे, दत्तु शेंडे, सुगंधा तिवाडे, केंद्रप्रमुख महल्ले, प्रा. अशोक चरडे आदी मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन प्राचार्य वडस्कर, मुख्याध्यापिका ढाकुणकर, कढव, मेहरकुरे, मिलमिले, लोडे, गिरडे, गौरकार, उमरे, बोरकर, गोमासे जादीने केले आहे.