सीएमपी प्रणालीत अशासकीय कपात निधीसाठी मुख्याध्यापकांना खाते काढण्याची सक्ती नसावी

32

🔹अशासकीय कपात गटशिक्षणाधिकारी यांचे खात्यात जमा करा

🔸महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20जानेवारी):-शिक्षण संचालक (प्राथमिक ), शिक्षण संचालनालय म. रा. पुणे यांचे दुरध्वनी निर्देश दि. 23/ 11/ 2022 व शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.चंद्रपूर यांचे पत्र क्र./शिक्षण(प्राथ)बजेट/425/2022 दि. 24/ 11/2022 यांचे पत्रान्वये प्रायोगिक तत्वावर जि.प.चंद्रपूर व जि.प.जालना येथील प्राथमिक शिक्षकांचे वेतन व अशासकीय कपात निधी CMP प्रणाली अंतर्गत करण्यासाठी कळविले आहे. त्यानुसार जि.प.चंद्रपूर शिक्षण विभागाने सर्व पंचायत समितीच्या मान.गटशिक्षणाधिकारी यांना CMP प्रणालीदवारे वेतन व अशासकीय कपात निधी जमा करणेसाठी मुख्याध्यापकांना शाळेचे वेतन खाते काढण्यासाठी सुचित केलेले आहे.

मात्र CMP प्रणाली चे स्वरुप , कपातीचा हिशेब,वेतन बील प्रक्रिया व इतर बाबींची कुठलीही माहिती न देता किंवा प्रशिक्षण न घेता सरसकट मुख्याध्यापकांना शाळेचे वेतन खाते मुख्याध्यापकांचे नावाने काढण्याचे आदेश दिले आहे. सदर बाब जिल्हा स्तरावरील शालार्थ प्रणाली सांभाळणारे कर्मचारी सुदधा याबाबत अनभिज्ञ आहेत.
CMP प्रणाली प्राथमिक शिक्षकांचे वेतन व अशासकीय कपात निधीसाठी सुरु करण्यात यावी परंतू मुख्याध्यापकांना शाळेचे वेतन खाते काढण्याची सक्ती नसावी.,जी.पी.एफ प्रमाणे आयकराची रक्क्म ऑनलाईन कपात करण्यात यावी. शाळेत पुरेसा मनुष्यबळ नसल्याने रोकड वही,आयकर चालान,पतसंस्था कपात निधी रेकार्ड व चेक अदा करणे, यासारखे अशैक्षणिक कामाचा रेकार्ड अद्यावत ठेवावे लागेल परिणामी शैक्षणिक कार्याकडे दुर्लक्ष होईल.

अशासकीय कपात निधी (आयकर,एल.आय.सी.पतसंस्था कपात निधी) मान.गटशिक्षणाधिकारी यांचे खात्यात जमा करण्यात यावी कारण प.स.स्तरावर जेष्ठ,कनिष्ठ लिपीक कार्यरत असतात. आयकर कपात रक्क्म मुख्याध्यापकांचे वेतन खात्यात जमा केल्यास संबंधित शाळेला TAN / PAN काढावे लागेल तसेच Efilling करावी लागेल व तसा रेकार्ड अद्यावत ठेवावे लागेल. त्यामुळे शालार्थ प्रणाली मध्ये Incometax Deduction ची वेगळी Tab देण्यात यावी व ऑनलाईन कपात करण्यात यावी.

CMP प्रणाली लागु करतांना मुख्याध्यापकांचे वेतन खाते काढण्याची सक्ती न करता सदर प्रणाली लागु करावी व अत्यंत सोईची व सुलभ होईल अशीच प्रक्रिया राबविण्यात यावी. यासबंधीचे निवेदन सुधीरभाऊ मुनगंटीवार चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर,शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.चंद्रपूर यांना निवेदनादवारे राज्यनेते विजय भोगेकर, राज्यसरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे,राज्यसचिव निखील तांबोळी, प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,सरचिटणीस संजय चिडे,कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर , उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले,भाउुराव बोंडे जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर, अध्यक्ष . विद्या खटी, सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे, कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, कोषाध्यक्ष लता मडावी, उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, ,सहसचिव दुष्यंत मत्ते,प्रमुख संघटक नरेश बोरीकर, संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केलेली आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे एका पत्रकान्वये कळविले आहे.
—————————- ———–

मुख्याध्यापकांना वेतन खाते काढण्याची सक्ती न करता व कोणत्याही प्रकारचा वेतनासंबंधीचा हिशेब ठेवण्याचा प्रकार न ठेवता अगदी सोईचे व सुलभ प्रक्रिया सी.एम.पी.संबंधाने राबविण्यात यावी. अशासकीय कपात निधी गटशिक्षणाधिकारी यांचे खात्यात जमा करण्यात यावी. त्यांचेकडे लिपीगवर्गीय कर्मचारी आहेत. व PAN TAN काढण्यात आलेले आहे.
– किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष पुरोगामी प्राथ.शिक्षक समिती.