उमापूरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी केली वृक्षलागवड

35

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.22जानेवारी):-वाढते प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, विरळ ओझोन थर, समृद्र सपाटीत वाढ, नैसर्गिक आपत्ती आणि यातून होणारे प्रचंड आर्थिक नुकसान हे मानवाच्या प्रगतीला बाधा पोहोचत आहे. पृथ्वीला होत असलेल्या हानीला थांबविणे एवढेच पुरेसे नसून पृथ्वीला पर्यावरण होसाच्या संकटापासून वाचविण्यासाठी वेळ आली आहे. त्यासाठी आता जगाच्या सर्व स्तरावरून प्रयत्न होत आहेत. यासाठी शासन विविध सामाजिक संघटना ही वृक्ष लागवडीसाठी पाठबळ देत असते. उमापूरच्या जिल्हा परिषद शाळेची मोठी भव्य इमारत आहे.

समोर मोठे मैदानही आहे याची इमारती समोर शिक्षकांच्या स्वखर्चातून (दि,१९ जानेवारी) रोजी २९ मोठे दहा फुटी अशोक, नारळ, बाॅटल पाम आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे शाळेच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून वृक्षांची खरेदी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक मनोज ठाकूर, कन्या शाळेचे मुख्याध्यापक वाळवी सर, शालेय व्य. समिती अध्यक्ष संतोष गिरी, उपाध्यक्ष मोबीन नाईकवाडी सदस्य शरदराव आहेर, लक्ष्मणराव आहेर, जुबेर कुरेशी, विनोद कापसे, हरुन शेख यांच्यासह शिक्षकवृंद शेख अनिस सर, गर्जे सर,भगवान फुंदे सर आधी उपस्थित होते