मोर्शी राज्य उत्पादन शुल्क विभागाची दबंग कारवाई

  39

  ?विदेशी दारू चा पंचवीस लाख रुपयाचा साठा जप्त

  ?मध्य प्रदेशातून आणला जात होता दारू साठा

  ✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

  अमरावती(दि 15जुलै):- आज रोजी रात्रौ दोन ते पहाटे तीन वाजताच्या सुमारास  राजेश कावळे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अमरावती) यांचे मार्गदर्शनाखाली  उत्पादन शुल्क मोर्शीचे निरीक्षक के. जी आखरे तसेच सहाय्यक निरीक्षक रवी राऊतकर, दिनकर तिडके ,राहुल जयस्वाल ,सुजित जाधव, तसेच वाहन चालक भोकरे यांनी लोक डाऊन कालावधीत धाडसत्र राबवून दारूबंदी गुन्हेसंबंधी हिवरखेड ते सालबर्डी रोडवर पाळत ठेवून आरोपी  रितेश राजेंद्र आर्य (वय38 वर्षे), राहणार चिंचोली ,तालुका चिंचोली जिल्हा बैतूल .व निलेश रामदास शिवहरे (वय वर्ष 31).राहणार पटटन ,तालुका मुलताई जिल्हा बैतूल व इतर तीन यांना एक आयशर प्रो. 1114 एक्सपी सहा चाकी वाहन जिच्यापुढे ” जय बाबेरी” असे लिहिलेले होते. वाहन नंबर एम एच ४० बी जी ८३१८ असा नंबर लिहिलेला आहे ,सदरचे वाहनातून विदेशी व बियर मद्याचा मोठ्या प्रमाणात 466 पेट्या जप्त करण्यात आल्या.

  दोन्ही आरोपीस मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 29 ,81,83 व महाराष्ट्र थेट वाहतूक नियम 199,07 चे ,3(1 )ब, अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईत एकूण 24 लाख 96 हजार 474 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.‌ ही कार्यवाही के.जी.आखरे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तसेच सहाय्यक निरीक्षक रवी राऊतकर, जवाण दिनकर तिडके, राहुल जयस्वाल ,सुजित जाधव ,तसेच वाहनचालक  भोकरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.