घुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगातर्फे निशुल्क चिकित्सा शिबिर

67

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.23जानेवारी):- लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून ३० जानेवारी २०२३ सोमवार रोजी निशुल्क चिकित्सा शिबीराचे आयोजन बालाजी सभागृहात करण्यात आले.सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात नागपूरचे मेडिट्रीना इन्स्टिट्यूट आफ मेडीकल सायन्सच्या सहकार्याने तज्ज्ञ अधिकारी उपस्थित राहून रुग्णांची तपासनी करणार आहेत.

घुग्घुस येथील व परिसरातील गावातील लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात जात असून, सामाजिक दायित्व जोपासत आता निशुल्क चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन लाइट्स मेटल्स कंपनीतर्फे करण्यात आले वरिष्ठ प्रमुख हेड यांच्या मार्गदर्शनात नोंदणीसाठी श्री.रतन मेढा (७०२००३०७५०) व श्री. धनंजय सागुळले(७४९९९१०१०२) यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले.