त्या एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याच; पोलिसांचा खुलासा

32

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.25जानेवारी):-एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आल्यानंतर पुण्यात जिल्ह्यात खळबळ उडाली. मुलाने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणल्यानं बदनामीच्या भीतीने 7 जणांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलंय. 7 जणांनी आत्महत्या केली नाही, तर त्यांची हत्या करण्यात आल्याचं तपासातून समोर आलंय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केलीये.

पुणे जिल्ह्यातल्या पारगाव (तालुका दौंड) येथे एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडले. भीमा नदीपात्रात आधी सोमवारी (23 जानेवारी) चार मृतदेह आढळून आले. त्यानंतर मंगळवारी (24 जानेवारी) आणखी तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

मोहन उत्तम पवार (वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (वय 45 वर्षे) जावई श्यामराव पंडित फुलवरे (वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (वय 27 वर्षे) श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू श्यामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या भीमा नदीपात्रात आढळून आलेले आहेत. मोहन पवार हे मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी असून, एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे रहाण्यास आले होते.

सात जणांची आत्महत्या नव्हे, हत्या; पाच जणांना अटक

7 जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याप्रकरणात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती हाती लागलीये. पुणे ग्रामीण पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

नदीत मृतदेह आढळलेल्या 7 जणांना आत्महत्या केली नाही, तर त्यांची हत्या करण्यात आल्याचा अँगल समोर आला आहे. माहितीनुसार मयताच्या चुलत भावानेच 7 जणांचा खून केला आहे. आरोपीच्या मुलाचा अपघात घडवून आणत खून केल्याच्या संशयातून 7 जणांची हत्या करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.