शहीद भगतसिंग शाळेमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

28

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 26 जानेवारी) उमरखेड शहरातील नगरपालिकेची शहीद भगतसिंग शाळा क्रमांक दोन मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास सुरुवात महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तर तिरंग्याचे ध्वजाचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड सर व शाळेच्या माजी मुख्याध्यापिका दीपा पोफाळकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांनी भारत देशाचा विजय असो… अशा घोषणा देऊन व राष्ट्रगीत सादर करून भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

तर देश भक्ती गीतमंचावर शुभांगी डोके, राखी भडंगे,पायल वाढवे, दुर्गा पवार, मुक्ताई मुंगे यांनी गीत सादर केले.

यावेळी पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, राठोड सर, सुर्यवंशी सर, बुरफूले सर, कोरडे सर, चौधरी सर, राजे सर, कवडे सर, गिरी सर, मुटकुळे सर, मेटकर सर, सोनेवाड मॕडम, नंदनवार मॕडम, बोके मॕडम, नरवाडे मॕडम, पवार मॕडम शिंदे, मॕडम लोमटे सर इत्यादि शाळेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.