मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न !

71

🔸शेकडो माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.28जानेवारी):-येथील भारतीय महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला असून भारतीय महाविद्यालयात शेकडो माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेण्यात आला.

“महाविद्यालयाच्या नावलौकिकाच्या दृष्टीने अनेक घटक कार्यरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे माजी विद्यार्थी. हा माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण येथून शिक्षण घेऊन गेलेला माजी विद्यार्थी बाहेरच्या जगात आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित असतो. व त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडत असते.” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रोहित प्रसाद तिवारी यांनी येथे केले.

यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रा दीपक काळे यांनी नॅक मानांकनासाठी माजी विद्यार्थी संघाचे महत्व, या संघटनेचे महाविद्यालयाच्या प्रगती मध्ये योगदान स्पष्ट करून सांगितले. तसेच माजी विद्यार्थी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आपल्या जडणघडणीत महाविद्यालयाचा मोलाचा वाट असून भारतीय महाविद्यालय यांच्या समवेत असणाऱ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समाजात सर्व क्षेत्रात कार्यरत असून महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये त्यांनी हातभार लावावा असे आवाहन केले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीश बांबोळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नितीन उमाळे, रोहितप्रसाद तिवारी, संदीप रोडे, दिलीप वानखेडे, जयभरात देशमुख, गजानन चौधरी,रुपेश वाळके, अंकुश ठाकरे, दीपक नेवारे, निखिल ओझा, पंकज शर्मा, पवण शर्मा, प्रवीण धोटे, अजय गोमकाळे, हरीश निशाण, हर्षल चौधरी, नितीन लुंगे, चेतन काळमेंघ, रितेश अंगणानी, रुपेश ढोले, अर्जुन अमृते, हर्षवर्धन पापडकर, संजय वानखेडे, घनश्याम दाणे, भैया चिखले, विनायक खाडे, मनोज नगोते, विकास छापाने, अजिंक्य लुंगे, नरेंद्र निकम, विशाल वानखडे, यांच्यासह आदी माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप राऊत यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दीपक काळे, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा भगवान साबळे यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थ्यांची भूमिका डॉ सावन देशमुख यांनी मांडली. या मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा सुरेश बिजवे, प्रा. विनायक खांडेकर, रुपेश मेश्राम, अरविंद पाझरे, यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंदाने परिश्रम घेतले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी कायम संपर्कात राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ रजनीश बांबोळे यांनी केले आहे.